शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

निमोणेत विद्यार्थ्यांना दाखले मिळेनात

By admin | Updated: June 17, 2015 22:49 IST

येथील श्री नागेश्वर विद्यालयामध्ये संस्थेने पात्र मुख्याध्यापकांची नेमणूक न केल्याने इ. १०वीचा निकाल लागूनही विद्यार्थ्यांना दाखले

निमोणे : येथील श्री नागेश्वर विद्यालयामध्ये संस्थेने पात्र मुख्याध्यापकांची नेमणूक न केल्याने इ. १०वीचा निकाल लागूनही विद्यार्थ्यांना दाखले मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. निमोणे येथे पाषाण येथील श्री नेहरू शिक्षण संस्था संचालित श्री नागेश्वर विद्यालय आहे. अनेक वर्षांपासून संस्थेच्या अनियमित कारभारामुळे आणि ग्रामसंस्थांच्या वेळोवेळीच्या आंदोलनामुळे हे विद्यालय नेहमी चर्चेत राहिले आहे. गेल्या शैक्षणिक वर्षात ग्रामस्थांनी वेळोवेळी उपोषणाचे अस्त्र वापरले होते. सेवाज्येष्ठतेनुसार पात्र मुख्याध्यापकांची नेमणूक न करणे, शासनाच्या शिक्षण विभागाची मान्यता असणाऱ्या मागसवर्गीय शिक्षकांना अध्यापन सेवेपासून रोखणे, अनधिकृत शिक्षकांची नेमणूक करणे असे कितीतरी गंभीर आरोप ठेवून ग्रामस्थांनी आंदोलने केली आहेत. याशिवाय संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकांची नेमणूक करणे या मागणीवर ग्रामस्थ ठाम आहेत. या विद्यालयामध्ये दोन वर्षांपासून पात्र मुख्याध्यापक नसल्याने शालेय प्रशासकीय कामकाजात नेहमी अनियमितपणा आलेला आहे. त्यामुळे सन १४-१५ या शैक्षणिक वर्षाचा वार्षिक निकालही विद्यार्थ्यांना मोठ्या विलंबाने मिळाला. नुकताच इ. १०वीचा निकाल लागला. निकाल लागल्यानंतर इ. ११वी किंवा अन्य पुढील शिक्षणासाठी इ. १०वीचे शाळा सोडल्याचे दाखले त्वरित हवे असतात. मात्र, या विद्यालयामध्ये शिक्षकांची सेवाज्येष्ठता डावलून नव्या मुख्याध्यापकांची नेमणूक केली असल्याने त्यांना सह्यांचे अधिकार नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अद्यापही दाखले मिळालेले नाहीत. विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी अर्ज भरण्याची धावपळ चालू असताना निमोणे येथील विद्यार्थ्यांना दाखले मिळत नसल्याने विद्यार्थी वर्ग हवालदिल झाला आहे. नवीन वर्गासाठी प्रवेशाचे अर्ज भरण्याची मुदत संपली, तर हे विद्यार्थी दाखल्याअभावी अर्ज भरू शकत नसल्याने त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.