शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पाॅकेटमनीसाठी ते उठतात पहाटे 3 वाजता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 18:02 IST

शिपायाच्या जागेसाठी हजाराे उच्चशिक्षितांचे अर्ज अाल्याची अनेक उदाहरणे अापल्या समाेर अाहेत. अनेक तरुण काम नसल्याची अाेरड करत असतात. मात्र पुण्यातील अविराज पॅम्पलेट बाॅईज ग्रुपचे तरुण अापल्या पाॅकेटमनीसाठी पहाटे 3 वाजता उठून वृत्तपत्रांमध्ये पॅम्पलेट भरण्याचे काम करतात. त्यांची कहाणी सर्वांसाठीच प्रेरणादायी अाहे.

पुणे : सध्या देशात बेराेजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत अाहे. राेजगाराच्या पुरेश्या संधी उपलब्ध नसल्यामुळे उच्चशिक्षित तरुण बेकार असलेले पाहायला मिळत अाहे. पुण्यातील अविराज पॅम्पलेट बाईजची कहाणीच मात्र निराळी अाहे. नळस्टाॅप चाैकात राेज सकाळी हे पॅम्पलेट बाॅईज वृत्तपत्रांमध्ये जाहीरातींचे पॅम्पलेट टाकण्याचे काम करतात. अापण अाईवडीलांकडे पाॅकेटमनी मागायचा नाही, तर अापला पाॅकेटमनी अापणच मिळवायचा या उद्देशाने हे तरुण पहाटे 3 वाजता उठून वृत्तपत्रांमध्ये पॅम्पलेट टाकण्याचे काम करतात.     या तरुणांची घरची परिस्थीती तशी चांगली अाहे. हे तरुण विविध महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत अाहेत, तर काहीजन विविध ठिकाणी नाेकरी करत अाहेत. शिक्षण घेत असताना इतर खर्च भागविण्यासाठी अापल्या अाई-वडिलांकडे पैसे मागण्यापेक्षा स्वतः पैसे कमवायचे या विचाराने हे तरुण काम करतात. या तरुणांना हे काम करताना कुठलिही लाज वाटत नाही. तर अापण आपल्या खर्चासाठी अाई-वडिलांवर अवलंबून नाही याचा त्यांना अभिमान वाटताे. राेज पहाटे उठून ते नळस्टाॅप चाैकात येतात. जाहीरातदाराच्या अपेक्षेप्रमाणे पॅम्पलेट भरभर वृत्तपत्रांमध्ये भरतात. दाेन ते तीन तासात अापले काम अाटाेपून अापल्या दिवसभराच्या इतर कामांसाठी जातात. साधारण तिनशे ते चारशे रुपये त्यांना राेज मिळतात. 22 तरुणांचा हा ग्रुप असून राेज न चुकता अापले काम उत्साहाने करतात. ज्यांच्या घरची परिस्थिती बेताची अाहे त्या तरुणांना पहाटेच्या या दाेन तासाच्या कामाने थाेडा का हाेईना हातभार लागत अाहे.     या मुलांना अविराज चव्हाण या तरुणाने एकत्र अाणले अाहे अाणि त्यांना काम दिले अाहे. अविराज म्हणाला, माझी सुरुवातही याच कामातून झाली. मला त्यावेळी कळालेलं पैशांचं मह्त्व मी तरुणांना सांगताे. अाज अनेक महाविद्यालयीन तरुण अापल्या पाॅकेटमनीसाठी हे काम करतात. अाज सगळीकडे काम नाही, नाेकऱ्या नाही अशी अाेरड पाहायला मिळते. परंतु ज्याची काम करण्याची इच्छा अाहे, त्याला काम हे मिळतेच. अाज माझ्यासाेबत अनेक मुलं काम करतात. सकाळी पहाटे उठून काम करावं लागत असल्याने यात कष्ट खूप अाहेत. पण कष्टाशिवाय या जगात पर्याय नाही. 

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीMONEYपैसाkothrudकोथरूड