शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वाघोली येथे विद्यार्थ्याच्या भरधाव कारने सुरक्षा रक्षकाला उडवले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 19:52 IST

कारवरील नियंत्रण सुटल्याने विद्यार्थ्याने खुर्चीवर बसलेल्या सुरक्षा रक्षकास जोरात धडक दिली.

ठळक मुद्देसुरक्षा रक्षकाचा खासगी रग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू

वाघोली : वाघोली येथील जयवंत शिक्षण मंडळाच्या कॉलेज कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचे भरधाव वेगाच्या गाडीवरील नियंत्रण सुटल्याने सुरक्षा रक्षकाला जोराची धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सुरक्षा रक्षकाचा खासगी रग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. विद्यार्थ्याविरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात उत्तम कैलास खंडागळे असे मृत्युमुखी पडलेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. तर सौरभ वारघडे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंजिनिअरींगच्या तृतीय वर्षात शिकणाऱ्या वारघडे हा शेवटचा पेपर दिल्यानंतर आपल्या कारने कॉलेज कॅम्पसमधून घरी निघाला होता. यावेळी त्याच्या कारचा वेग प्रचंड होता. त्याचे कारवरील नियंत्रण सुटल्याने त्याने खुर्चीवर बसलेल्या खंडागळे या सुरक्षा रक्षकास जोरात धडक दिली. या धडकेने तो सुरक्षा रक्षक १५ फूट लांब फेकला गेला. या धडकेत लोखंडी खांब खाली कोसळला आणि गाडी बाजूच्या झाडावर जाऊन आदळली. या धडकेत सुरक्षारक्षक गंभीर जखमी झाला. त्याला वाघोली येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्याच्या डोक्याला आणि तोंडाला मार जास्त असल्याने पुढील उपचारासाठी जहागिर येथे दाखल करण्यात आले. पुढील उपचार चालू असताना सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.या अपघातातील वारघडे हा सुध्दा जखमी झाला असून त्याच्यावर वाघोली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. घटनेचा पुढील तपास लोणीकंद पोलीस करत आहे. 

टॅग्स :Puneपुणेwagholi/lonikand policeवाघोली/लोणीकंद पोलीसAccidentअपघातPoliceपोलिसCrimeगुन्हा