धक्कादायक ! कबड्डी खेळताना चक्कर येऊन विद्यार्थ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 01:47 PM2018-04-01T13:47:30+5:302018-04-01T13:47:30+5:30

कबड्डीचा सामना चालू असताना मैदानावर चक्कर येऊन काेसळून विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील नवाेद्य महाविद्यालयात ही घटना घडली.

studend died while playing kabaddi | धक्कादायक ! कबड्डी खेळताना चक्कर येऊन विद्यार्थ्याचा मृत्यू

धक्कादायक ! कबड्डी खेळताना चक्कर येऊन विद्यार्थ्याचा मृत्यू

पुणे  : कबड्डीचा सामना चालू असताना चक्कर येऊन पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना समाेर अाली अाहे. शनिवारी शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील नवाेद्य विद्यालयात सायंकाळी साडेसातच्या दरम्यान हि घटना घडली. 
    गौरव अमोल वेताळ, असे विद्यार्थ्याचे नाव असून तो नवोदय विद्यालयात इयत्ता आठवीच्या वर्गात शिकत होता. पाेलीसांनी दिलेल्या माहितीनुसार  गौरव आपल्या संघाकडून नवोदय विद्यालयाच्या मैदानावर सामना खेळण्यासाठी आला होता.प्रतिस्पर्धी संघासाेबत कबड्डी खेळत असताना गाैरवला अचानक चक्कर अाली अाणि ताे खाली काेसळला. काही काळ उपस्थितांना काय घडले हे कळत नव्हते. मात्र काही वेळाने गाैरव उठत नसल्याचे लक्षात अाल्यावर शिक्षकांनी मैदानावर धाव घेतली. शिक्षकांनी त्याला शिक्रापूर येथील माऊलीनाथ मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.  दरम्यान गौरवचे शवविच्छेदन झाले असून त्याचा अहवाल येणे बाकी अाहे. त्यानंतर त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट हाेईल. 
    गौरवच्या जाण्याने परिसरावर शोककळा पसरली असून, शिक्रापूर पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Web Title: studend died while playing kabaddi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.