शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

संघर्ष ‘त्यांचा ’अंत्यविधीेसाठी...! रॉकेल मिळेना आणि डिझेलचा धोका टाळता येईना ....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 17:01 IST

वडगाव शहरातील स्मशानभूमीत दहा दिवसांपूर्वी एक अंत्यविधीसाठी संपूर्ण शहरात फिरूनही रॉकेल मिळाले नाही. त्यामुळे खाद्यतेल टाकण्यात आले...

ठळक मुद्देगरीब ,आदिवासी कुटुंबांची होतेय फरपट 

वडगाव मावळ : शेवटचा दिवस गोड व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. परंतु, ही शेवटचा विसावा घेण्याच्या इच्छेसाठी सुध्दा अतोनात संघर्ष केला जातोय.. मावळ परिसरात काही गावात स्मशानभूमी नाही तर काही ठिकाणी स्मशानभूमी असेल तरी गॅसशवदाहिनीची व्यवस्था नाही. त्यात भर म्हणजे शासनाने मावळ तालुक्यातील शहरी भागात रॉकेलपुरवठा बंद केला आहे. त्यामुळे गेल्या चार महिन्यांत अनेक ठिकाणी अंत्यविधीला रॉकेलऐवजी डिझेलचा वापर करण्याची वेळ आली आहे. आणि डिझेलचा वापर धोकादायक आहे. परंतु रॉकेल अभावी धोका पत्करण्याची वेळ त्या कुटुंबीयांवर आली.रॉकेलमुक्त करून घरोघरी गॅस ही कल्पना शासनाने अंमलात आणली. त्यामुळे मावळ तालुक्यातील वडगाव, लोणावळा, तळेगाव दाभाडे, या शहरी भागात रॉकेलचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. यापूर्वी तालुक्यात ८० ते ९० टॅंकरद्वारे तालुक्यात स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत ग्राहकांना रॉकेलपुरवठा केला जात होता. तो पूर्णपणे बंद झाला आहे. तालुक्यातील संपूर्ण ग्रामीण भागासाठी फक्त बारा हजार लिटर रॉकेलचा पुरवठा ३६ गावांत केला जातो. ग्रामीण भागात अनेक भागांत आजही रॉकेलचा वापर केला जातो. त्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होतात.  वीस-तीस रुपयांच्या रॉकेलवर गरीब कुटुंब घरातील कामकाज करीत होती. परंतु रॉकेल बंद झाल्याने समस्या निर्माण झाली आहे. आदिवासी भागातील गोरगरीब कुटुंबांसाठी रॉकेलपुरवठा पुन्हा सुरू करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. 

गॅस शवदाहिनीची इमारत धूळ खात वडगाव शहरातील स्मशानभूमीत दहा दिवसांपूर्वी एक अंत्यविधीसाठी संपूर्ण शहरात फिरूनही रॉकेल मिळाले नाही. त्यामुळे गोडेतेल टाकण्यात आले. त्याचा काही परिणाम न झाल्याने डिझेलचा वापर करण्यात आला. डिझेल हे धोकादायक आहे. परंतु रॉकेल अभावी धोका पत्करण्याची वेळ त्या कुटुंबीयांवर आली. वडगाव येथील स्मशानभूमीत गॅसशवदाहिनीची इमारत बांधून तयार आहे. परंतु दोनवर्षांपासून धूळ खात आहे. गॅसशवदाहिनी सुरू करण्याबाबत संबंधित यंत्रणांची उदासिनता असल्याने त्याचा फटका नागरिकांना बसत आहे.

टॅग्स :mavalमावळpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDeathमृत्यूDieselडिझेल