अल्पवयीन विद्यार्थिनीबरोबर बळजबरीने शरीरसंबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 01:01 IST2018-12-20T01:00:59+5:302018-12-20T01:01:25+5:30

जुन्नर येथील घटना : युवकावर गुन्हा दाखल

Strongly correlate with a minor student | अल्पवयीन विद्यार्थिनीबरोबर बळजबरीने शरीरसंबंध

अल्पवयीन विद्यार्थिनीबरोबर बळजबरीने शरीरसंबंध

जुन्नर : तालुक्यात आश्रमशाळेत इयत्ता नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीशी सुट्टीच्या कालावधीत बळजबरीने शरीरसंबध ठेवल्याने ती गर्भवती राहिल्याप्रकरणी संबंधित मुलीच्या फिर्यादीवरून एका २२ वर्षीय तरुणावर जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.

आरोपी युवकाला ती अल्पवयीन असल्याची माहिती असूनही तिच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन तिच्यासोबत केलेल्या सलगीचे काढलेले फोटो इतरांना दाखवण्याची भीती दाखवत आरोपीच्या राहत्या घरी शरीरसंबंध ठेवले. परिणामी ती सात आठवड्यांची गरोदर राहिली आहे. सुट्टीनंतर आश्रमशाळेच्या नियमित आरोग्य तपासणीच्या माध्यमातून शासकीय रुग्णालयात झालेल्या तपासणीनंतर हा प्रकार उघडकीस आला. यानंतर तक्रार देण्यात आली. या प्रकरणी पोलीस निरीक्षक यशवंत नलवडे, सहायक पोलीस निरीक्षक नीलेश साबळे पुढील तपास करत आहेत. तर आरोपी युवकावर बाललैंगिक प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.

Web Title: Strongly correlate with a minor student