शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

Pune Lok Sabha Result 2024:पुण्यात मोहोळांचा दमदार विजय; धंगेकर पराभूत, जाणून घ्या पराजयाची कारणे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 15:03 IST

पुणे लोकसभेत लाखांपेक्षा जास्त मताधिक्य घेत मोहोळ यांनी सहज विजय मिळवला

पुणे: शहर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी एकहाती बाजी मारली. त्यांना ५ लाख ८४ हजार ५८६ मते मिळाली. कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील विजयाने चर्चेत आलेले आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) त्यांचे प्रतिस्पर्धी होते. त्यांनी लढत देण्याचा प्रयत्न केला, मात्र नेत्यांमधील गटबाजीने तो अयशस्वी ठरला. त्यांना ४ लाख ६१ हजार ४१९ मते मिळाली. धंगेकर पराभूत होण्यामागे आणि मोहोळ यांच्या विजयामागची प्रमुख कारणे समोर आली आहेत. 

विधानसभेच्या ६ मतदारसंघांपैकी कॅन्टोन्मेट वगळता कसबा, पर्वती, वडगाव शेरी, कोथरूड आणि शिवाजीनगर अशा ५ मतदारसंघात मोहोळ यांनी मताधिक्य मिळवले. त्यांच्या हक्काच्या कोथरूड मतदारसंघातच त्यांना ७५ हजार मतांपेक्षा जास्त मताधिक्य मिळवले. ते मोडणे धंगेकर यांना अवघड गेले. लाखांपेक्षा जास्त मताधिक्य घेत मोहोळ यांनी सहज विजय मिळवला. भाजपचा पुणे शहर लोकसभा मतदारसंघातील हा सलग तिसरा विजय आहे. यापूर्वी अनिल शिरोळे, गिरीश बापट व आता मोहोळ असे वेगवेगळे उमेदवार होते; मात्र भाजपला यावेळी मताधिक्य घटण्याचा धक्का बसला आहे.

पुण्याच्या विकासासाठीच मी माझ्या खासदारकीचा उपयोग करणार

लाेकसभा निवडणुकीतील विजय माझ्याबरोबरच महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे. प्रचारादरम्यान माझ्यावर वैयक्तिक आरोप झाले. मी त्याला प्रत्युत्तर दिले नाही. माझ्या पक्षाची शिकवण तशी नाही. प्रचारात आपण काय काम केले, आपल्या पक्षाने काय काम केले ते सांगावे, असे माझे मत आहे. त्याप्रमाणे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या कामांविषयी बोलत होतो. पुण्याच्या विकासासाठीच मी माझ्या खासदारकीचा उपयोग करणार आहे. - मुरलीधर मोहोळ, खासदार

पुण्यातील जय-पराजयाची कारणे काय?

मुरलीधर मोहोळ यांचा विजय कशामुळे?

- शहर भाजपची ताकद- राष्ट्रवादी, शिवसेनेचा पाठिंबा- आश्वासक चेहरा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा- वंचित, एमआयएमचा प्रभाव कमी हाेणे.

रवींद्र धंगेकरांचा पराभव का झाला?

- काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी- हक्काच्या कसबा मतदारसंघातही अपेक्षित मते न मिळणे- मतदानाच्या दिवशी अपुरी पडलेली काँग्रेसची यंत्रणा- रवींद्र धंगेकर यांना अतिआत्मविश्वास- मित्रपक्षांची अपेक्षित ताकद न मिळणे.

टॅग्स :Puneपुणेpune-pcपुणेmurlidhar moholमुरलीधर मोहोळravindra dhangekarरविंद्र धंगेकरcongressकाँग्रेसmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४