शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वीर, भाटघर, नीरा-देवघर धरणक्षेत्रांत दमदार पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 14:37 IST

गेल्या पाच ते सहा वर्षांपासून शहर आणि तालुक्यात अल्पपर्जन्यमान झाल्याने शेतकरीवर्ग अडचणीत आहे...

ठळक मुद्देगतवर्षीच्या तुलनेने धरणसाखळीत ७ टक्के पाणीसाठा कमी बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर तालुक्यांना प्रतीक्षा

बारामती : राज्यात सर्वत्र धुवाधार सुरू असताना बारामती शहर तालुका तुलनेने कोरडाच आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून शहर आणि तालुक्यात अल्पपर्जन्यमान झाल्याने शेतकरीवर्ग अडचणीत आहे. अपेक्षित पाऊस न झाल्याने ऐन पावसाळ्यात बागायती भागातील शेतकऱ्यांना नीरा डावा कालव्याच्या पाण्याने आधार दिला; मात्र धरण क्षेत्रात चांगला पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ३० जुलैपर्यंत भाटघर ६९.५६ टक्के, नीरा-देवघर ७७.३७ टक्के, वीर ९८.१९ टक्के पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी ३० जुलै रोजी हाच पाणीसाठा धरणनिहाय भाटघर ८४.६४ टक्के, नीरा-देवघर ८४.९३ टक्के,वीर ९८.१९ टक्के असा पाणीसाठा होता. यंदा एकूण धरणसाखळीमध्ये ७८.०४ टक्के पाणीसाठा असून, गेल्यावर्षी हाच पाणीसाठा ८५.१४ टक्के होता.बारामतीच्या बागायती परिसराला मूळ पाणीस्रोत उपलब्ध नाही. नीरा डावा कालव्यामुळे खºया अर्थाने संजीवनी मिळाली आहे. नीरा खोऱ्यातील धरणांमुळेच तालुक्याचा काही भाग बागायती झाला. तर, पाण्यापासून वंचित राहिलेला भाग जिरायती बनला. या भागात उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी देखील टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. नीरा डावा कालवा तालुक्याची जीवनदायिनी मानला जातो. त्याला कारणही तसेच आहे. बारामती शहर,परिसरात अल्प पाऊस पडून देखील केवळ नीरा डावा कालव्यावर शेती,पिण्याच्या पाण्याच्या योजना तारल्या जातात. त्यामुळे भाटघर, वीर, नीरा-देवघर धरणक्षेत्रातील पावसाकडेच बारामतीकरांच्या नजरा असतात.पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार : ३० जुलैपर्यंतचा धरणातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे.भाटघर धरण १६,३४८ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे, तर सध्या या धरणात ९६७ दशलक्ष घनफूटने पावसाचे  पाणी येत आहे. नीरा-देवघर धरणात ९०७५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. या धरणात ११९६ दशलक्ष घनफूटने पाणी येत आहे.वीर धरणात ९२३८ दशलक्षघनफू ट पाणीसाठा असून ११६५ दशलक्षघनफूटने धरणात पावसाचे पाणी येत आहे.दर वर्षी वर्षभरात ५ आवर्तने नीरा डावा कालव्याच्या आवर्तनाचे नियोजन पाटबंधारे खात्याच्या वतीने करण्यात येते. यंदा मात्र अनेक वर्षांनंतर प्रथमच नीरा-देवघरचे नीरा डावा कालव्याला मिळणारे पाणी थांबविण्यात येणार आहे.भाजप खासदारांच्या मागणीनंतर जलसंपदा विभागाने नीरा-देवघर प्रकल्पातून मिळणारे पाणी रोखण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दर वर्षी शेतीला मिळणाऱ्या पाच आवर्तनात दीड ते दोन आवर्तनाची घट होणार आहे. नेमके किती पाणी शेतीच्या आवर्तनामध्ये घटणार, याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा लवकरच होण्याची अपेक्षा आहे. खरीप हंगामासाठी नीरा डावा कालव्याचे आवर्तन  १६ जुलैपासून सोडण्यात आले आहे. त्यामुळे बारामतीचा बागायती भाग पाऊस लांबून देखील कालव्याच्या पाण्यावर तरला आहे. पाटबंधारे उपविभागाच्या आकडेवारीनुसार आजपर्यंत  बारामती शहर परिसरात ३११ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

तालुक्यातील इतर पाऊस पुढीलप्रमाणे : वडगाव निंबाळकर ४०५,मानप्पावस्ती ३०८ मिमी, पणदरे २४४, माळेगाव कॉलनी ३०९,सणसर १७५ मिमी,अंथुर्णे ११९ मिमी, निमगाव केतकी १५३ मिमी, बावडा ९५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर, नाझरे परिसरात ४२९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

.........शेटफळ हवेली तलावात ११.४७ दशलक्षघनफूट पाणीसाठाइंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली तलावात अवघा ११.४७ दशलक्षघनफूट पाणीसाठा आहे.हा पाणीसाठा शून्य टक्के असल्यात जमा आहे. या तलावावर परिसरातील १२ गावांची शेती अवलंबून आहे.या तलावात वीर-भाटघर धरणातूनच पाणी सोडण्यात येते.त्यामुळे धरणांमध्ये ६० टक्केपेक्षा अधिक पाणीसाठा झाल्यानंतरच, शेटफळ-हवेली तलावामध्ये पाणी नीरा डावा कालव्याद्वारे सोडण्यात येते. त्यामुळे या तलावात पाणी सोडल्यानंतरच, १२ गावांमधील शेतीला पाणी मिळणे शक्य होणार आहे.सध्या नीरा डावा कालव्याचे  शेती सिंचन आवर्तन सुरू आहे. शेती आवर्तन संपल्यानंतरच शेटफळ-हवेली तलावामध्ये पाणी सोडण्यात येणार आहे,अशी माहिती येथील प्रभारी अभियंता अजित जमदाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना .......पावसाने मारले, नीरा डावा कालव्याने तारलेबारामती तालुक्यात दोन मोठ्या साखर कारखान्यांचे कार्यक्षेत्र आहे. माळेगाव आणि भवानीनगर येथील श्री छत्रपती या दोन्ही कारखान्यांचे बारामती तालुक्यात हजारो एकर ऊसक्षेत्र आहे. ऊसपीक पूर्णपणे पाण्यावर अवलंबून आहे.ठिबक सिंचनाचा पर्याय वापरून कमी पाण्यावर ऊसपीक घेण्याचा मार्ग देखील दोन्ही कारखान्यांनी अवलंबला आहे; मात्र अल्प पर्जन्यमान झाल्यानंतर देखील नीरा डावा कालव्याच्या पाण्यावर हजारो एकर ऊसक्षेत्र जगविले जाते.त्यामुळे पावसाने  मारले तरी, नीरा डावा कालवा शेतकºयांना तारतो,असा कायमचा अनुभव आहे.याचे श्रेय ब्रिटिशांना दिले जाते.ब्रिटिशकालीन धरणे,कालव्यांमुळे ही किमया साधणे शक्य झाले आहे.......... पूल ४० हजार क्युसेक्स विसर्गास पाण्याखाली जाणार वीरधरण पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे वीर धरणातील विसर्ग वाढणार आहे. मंगळवारी (दि. ३०) सकाळी असणारा २३,५०० क्युसेक्सवर असणारा विसर्ग दुपारी ३४,५०० क्युसेक्स करण्यात आला. वीर धरणासमोरील पूल ४० हजार क्युसेक्स विसर्गास पाण्याखाली जाणार आहे. त्यामुळे संबंधितांनी आवश्यक दक्षता घ्यावी,असे आवाहन पाटबंधारे खात्याच्या वतीने करण्यात आले आहे.  

टॅग्स :BaramatiबारामतीDamधरणRainपाऊसdroughtदुष्काळ