शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षेबाबत पोलिसांना सक्त सूचना

By admin | Updated: July 4, 2015 00:30 IST

सिंहगड रस्ता परिसरात माथेफिरुने वाहनांची तोडफोड केल्यानंतर सोसायट्यांच्या तसेच वाहनांच्या सुरक्षेचा आढावा ‘लोकमत्’ाने बुधवारी रात्री केलेल्या ‘सिक्युरिटी चेक’ मधून घेतला.

पुणे : सिंहगड रस्ता परिसरात माथेफिरुने वाहनांची तोडफोड केल्यानंतर सोसायट्यांच्या तसेच वाहनांच्या सुरक्षेचा आढावा ‘लोकमत्’ाने बुधवारी रात्री केलेल्या ‘सिक्युरिटी चेक’ मधून घेतला. ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी पोलीस अधिका-यांना अधिक प्रभावी गस्त घालण्याच्या तसेच सोसायट्यांमधून सुरक्षेचा आढावा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, वृत्त प्रसिद्ध होताच शुक्रवारी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बळवंत काशिद यांना नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले आहे. सिंहगड रस्ता परिसरातील सनसिटी रस्त्यावर एका माथेफि रुने विविध सोसायट्यांमधील तसेच रस्त्यावरील वाहनांना पेटवले होते. पेट्रोलच्या टाकीचे पाईप काढून त्याला आग लावून पसार झालेला हा माथेफिरु अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. अशा प्रकारे सर्वसामान्यांची वाहने जाळणे आणि त्यातील आरोपी न सापडणे हे पोलीस दलाचे अपयश असल्याचेही पाठक म्हणाले. दरम्यान, आरोपीला पकडण्यासाठी स्थानिक पोलिसांसोबतच गुन्हे शाखेची चार पथके दररोज दिवस रात्री सिंहगड रस्ता आणि शहरात गस्त घालत आहेत. पोलिसांचा काही जणांवर संशय बळावला असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. परंतु हे संशयीत सध्या तरी भूमिगत झालेले आहेत.दरम्यान, सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न मोठा जटील झाला होता. यामुळे दोन आठवड्यांपूर्वीच पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांना विशेष शाखेत बदलण्यात आले होते. आयुक्त पाठक यांनी वरिष्ठ निरीक्षक यांना शुक्रवारी तडकाफडकी नियंत्रण कक्षाशी संलग्न केले.