Devendra Fadnavis | वाहतुकीस शिस्त लावण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात येणार- देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2023 13:25 IST2023-03-25T13:22:13+5:302023-03-25T13:25:01+5:30
जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत आमदार भाई जगताप यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता....

Devendra Fadnavis | वाहतुकीस शिस्त लावण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात येणार- देवेंद्र फडणवीस
पुणे : जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी अद्ययावत आयटीएमएस यंत्रणा बसविण्यात येत असून, वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी नियम तोडणाऱ्या वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.
जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत आमदार भाई जगताप यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी अत्याधुनिक आयटीएमएस यंत्रणा बसविण्यात येणार आहे. जेणेकरून लेनची शिस्त न पाळणाऱ्यांवर कारवाई करता येईल. मिसिंग लिंकदेखील पूर्ण होणार आहे. तसेच आताही लेनची शिस्त न पाळणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांद्वारे कारवाई करण्यात येत आहे.
तसेच मोटार वाहनांचा दंड वसुली करण्यासाठीही सर्व वाहनचालकांचे अद्ययावत मोबाइल क्रमांकाची माहिती करण्यात येईल.’’ या प्रश्नाच्या अनुषंगाने आमदार अनिकेत तटकरे, महादेव जानकर, सतेज पाटील यांनीही उपप्रश्न उपस्थित केले होते.