शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

बालकांवर अत्याचार केल्यास कठोर कारवाई : सूरज मांढरे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 18:57 IST

बालकांवर विविध कारणाने अन्याय, अत्याचार झाल्यास या समितीच्या वतीने सबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेची पाच सदस्यांची तक्रार निवारण समिती गठीततालुकास्तरीय समितीने घेतलेल्या निर्णयाविरूद्ध प्राप्त झालेल्या अपिलावर देखील कार्यवाही ३० दिवसांत राज्य समितीकडे अपील करता येणा

पुणे : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क अधिनियम २००९ चे कलम ३२ नुसार तक्रार निवारण यंत्रणा गठीत करण्यासाठी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने २१ एप्रिल २०१४ मध्ये निर्देश दिले आहेत. या आदेशानुसार महानगरपालिका क्षेत्र वगळून इतर सर्व ग्रामीण क्षेत्रासाठी जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. यामध्ये बालकांवर विविध कारणाने अन्याय, अत्याचार झाल्यास  या समितीच्या वतीने सबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. या समितीचे अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे असतील, तर सदस्य सचिव म्हणून प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सुनील कुऱ्हाडे , तसेच सदस्य म्हणून जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेचे प्राचार्य डॉ. कमलादेवी आवटे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. गणपतराव मोरे आणि तक्रार क्षेत्रातील गटशिक्षणाधिकारी/प्रशासन अधिकारी काम पाहणार आहेत. प्रामुख्याने या समितीच्या वतीने शासनाच्या आदेशानुसार बालकांना प्रवेश देण्याबाबत कॅलेंडर तथा प्रचार, प्रसार, प्रवेश, शुल्क, देणगी प्रक्रिया बालकामध्ये भेदभाव, बालकांना कोणत्याही वर्गात मागे न ठेवणे किंवा शाळेतून काढून टाकणे, शारीरिक शिक्षा व मानसिक छळ, वयाच्या पुराव्याअभावी प्रवेश, २५ टक्के राखीव जागांअंतर्गत रिक्त जागांवर प्रवेशास नकार, विद्यार्थी, शिक्षक प्रमाण राखणे, शेजार शाळांची उपलब्धता, शैक्षणिक साहित्य, शिक्षकांचे प्रशिक्षण, शिक्षकांची कर्तव्ये, शाळांसाठी भौतिक सोयी-सुविधा उपलब्धता आदी बाबत प्राप्त झालेल्या तक्रारींचे निवारण करण्यात येणार असल्याचे सूरज मांढरे यांनी सांगितले. त्याचबरोबर तालुकास्तरीय समितीने घेतलेल्या निर्णयाविरूद्ध प्राप्त झालेल्या अपिलावर देखील कार्यवाही करण्यात येणार आहे. ३० दिवसांत राज्य समितीकडे अपील करता येणारजिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीने दिलेल्या निर्णयावर एखादी व्यक्ती समाधानी नसल्यास त्या निर्णयाविरोधात त्या व्यक्तीला ३० दिवसांच्या आत राज्यस्तरावरील समितीकडे अपील करता येणार असल्याचे सूरज मांढरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाStudentविद्यार्थीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका