शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

ससूनच्या आॅक्सिजन यंत्रणेवर ताण, सुधारणा करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाचे युद्ध पातळीवर प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2020 2:56 PM

जम्बो’च्या अक्षमतेमुळे लागणार विलंब

पुणे : ससून रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना बाधित रुग्णांची आॅक्सिजनची गरज मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने यंत्रणेवर ताण येत आहे. या यंत्रणेमध्ये सुधारणा करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. सुमारे २०० रुग्ण जम्बो रुग्णालयात हलवून दोन टप्प्यांत हे काम केले जाणार होते. पण जम्बोच्या अकार्यक्षमतेमुळे जुन्या इमारतीतच रुग्ण हलवून हे काम पुर्ण करण्याचे नियोजन आहे. ससूनच्या नवीन इमारतीमध्ये टप्प्याटप्याने व्हेंटिलेटरची संख्या १२३ पर्यंत वाढविण्यात आली आहे. सुरूवातीला केवळ ५० व्हेंटिलेटरचे नियोजन करण्यात आले होते. सध्या एकही व्हेंटिलेटर उपलब्ध होत नाही. तसेच सध्या पाच आयसीयु आणि ४१९ आॅक्सिजन बेड आहेत. त्यासाठी प्रत्येक बेडपर्यंत पाईपलाईनद्वारे आॅक्सिजन पुरवठा केला जातो. सर्व बेडवर रुग्ण असले तरी प्रत्येकाला आॅक्सिजनची गरज भासत नाही. गरजेनुसार रुग्णांना कमी-अधिक प्रमाणात पुरवठा होतो. मात्र व्हेंटिलेटरवरील रुग्णांची आॅक्सिजनची खुप अधिक आहे. रुग्णालयामध्ये १३ हजार किलो लिटर क्षमतेची आॅक्सिजन टँक आहे. किमान दिवसाआड तो टँक भरावा लागतो. मागील पाच महिन्यांत आॅक्सिजनची मागणी टप्प्याटप्याने वाढत गेल्याने आता ही यंत्रणा अधिक सक्षम केली जाणार आहे. टँकच्या मुख्य पाईपलाईनची क्षमता वाढविणे, लिक्विड आॅक्सिजनचे गॅसमध्ये रुपांतर करण्यासाठी आवश्यक यंंत्रणा दुप्पट करणे, गॅस सिलिंडर वाढविणे, नवीन टँक उभारणे ही कामे केली जाणार आहेत. जुन्या इमारतीमध्ये एक-दोन दिवसांत १०० ते १२० बेड सज्ज होणार आहेत. तिथे नवीन इमारतीतील एका-एका मजल्यावरील आॅक्सिजनवरील रुग्ण टप्प्याटप्याने हलवून काम केले जाणार आहे. तिथे ६ हजार किलो लिटर आॅक्सिजन टँकचे काम पुर्ण करण्यात आले आहे. -------------ससूनची सद्यस्थिती (नवीन व जुनी इमारत)एकुण खाटा - ५४७रुग्ण - ५४७आॅक्सिजनवरील - ४१९आयसीयु - ५व्हेंटिलेटरवर - १२३----------------आॅक्सिजनची मागणी वाढल्याने यंत्रणेची क्षमता वाढविली जाणार आहे. त्यासाठी जुन्या इमारतीत रुग्ण हलविले जातील. जम्बोमध्ये रुग्ण हलविले असते तर हे काम लवकर पुर्ण झाले असते. पण तेथील अपुºया सुविधांमुळे रुग्णांची कोणत्याही प्रकारची हेळसांड होऊ नये, यासाठी हा निर्णय घेतला. - एस. चोकलिंगम, प्रशासकीय अधिकारी, ससुन रुग्णालय-------------

टॅग्स :Puneपुणेsasoon hospitalससून हॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्या