शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

भटकी कुत्री उठली जीवावर..! शहरात ११ महिन्यांत २३,३७४ नागरिकांवर कुत्र्यांचा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 12:33 IST

पुणे : शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्यांची सर्वत्र दहशतच पसरली आहे. काही दिवसांपर्यंत या माेकाट कुत्र्यांचा ...

पुणे : शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्यांची सर्वत्र दहशतच पसरली आहे. काही दिवसांपर्यंत या माेकाट कुत्र्यांचा त्रास फक्त रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्यांना हाेत हाेता. मात्र, मागील काही दिवसांत शहरात अशा काही घटना घडल्या आहेत की, ज्यामुळे भरदिवसा देखील फिरणे अवघड झाले आहे. ही भटकी कुत्री एवढी निर्ढावली आहेत की, सरळ साेसायटींच्या आवारात खेळणाऱ्या चिमुकल्यांवर दिवसाढवळ्या हल्ला करत आहेत. ग्रामीण भागात बिबट्यांची दहशत आहे, तर शहरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. शहरात जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांत तब्बल २३ हजार ३७४ नागरिकांवर कुत्र्यांनी हल्ला केला आहे. त्यानंतरही प्रशासन ठाेस कारवाई करत नाही. त्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

आंबेगाव पठारमधील चंद्रागण सोसायटी फेज नंबर ०७ मध्ये पार्किंगमध्ये खेळत असताना समर्थ सूर्यवंशी या पाच वर्षांच्या मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. त्यामध्ये हा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या मुलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने पुन्हा एकदा पुणे शहरासह उपनगरामध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुणे शहरात हॉटेल्स, खाऊगल्ल्या, कचरापेट्या, मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणात भटकी कुत्री आढळतात.गल्लीबोळांमध्ये समूहाने राहणारी भटकी कुत्री रात्री-अपरात्री गाड्यांवर धावून जातात. वाहनचालकाच्या पायाचा चावा घेतात. पदपथांवर चालणारी लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांवर कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. त्याचा नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे महापालिकेने तत्काळ यावर उपाययोजना करावी, अशी मागणी सातत्याने नागरिक करत आहेत.

आठ महिन्यांत ३७,४९५ कुत्र्यांवर नसबंदी

पुणे महापालिकेने २०२४ च्या एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांत ३७ हजार ४८६ भटकी आणि मोकाट कुत्री पकडून त्यांच्यावर नसबंदी शस्त्रक्रिया केली आहे. या कुत्र्यांना रेबीजचे लसीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती महापालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका फुंडे यांनी दिली.

 नागरिकांच्या झोपेचे वांदे

शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या वाढतच असून, सकाळी फिरायला जाणाऱ्या, घराबाहेर, सोसायटीत खेळणारी मुलं, रात्री उशिरा दुचाकीवर असलेल्या नागरिकांवर या भटक्या कुत्र्यांकडून होणार हल्ले वाढले आहेत. तसेच काही भागांत टोळीने राहणारी ही भटकी कुत्री रात्रीच्या वेळी प्रचंड मोठ्या व विचित्र आवाजात विव्हळल्याने नागरिकांच्या झोपेचे वांदे झाले आहेत.

 उपाययोजना अपूर्ण पडत आहेत

शहराचा वाढता विस्तार, रस्त्यावर टाकला जाणार कचरा, या भटक्या कुत्र्यांवर प्रेम करून त्यांना खाऊ घालणारे नागरिक यामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या कुत्र्यांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी महापालिकेच्या वतीने नियमितपणे या कुत्र्यांची नसबंदी करण्यात येते; परंतु भटक्या कुत्र्यांची प्रचंड संख्या लक्षात घेता या उपाययोजना खूपच अपूर्ण पडत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भटकी कुत्री चावल्याच्या घटना

२०१९ - १२ हजार २५२

२०२० - १२ हजार ७३४

२०२१ - १५ हजार ९७२

२०२२ - १६ हजार ०७७

२०२३ - २१ हजार ००२

 

२०२४ मध्ये कुत्र्यांनी घेतला चावा

जानेवारी : १९७३

फेब्रुवारी : २०९३

मार्च : १९६१

एप्रिल : १९२०

मे : २८३९

जून : २१९९

जुलै : २०१२

ऑगस्ट : १९३७

सप्टेंबर : २०२६

ऑक्टोबर : २१८९

नोव्हेंबर : २२२५  

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रdogकुत्राMuncipal Corporationनगर पालिकाHealthआरोग्य