शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
2
३१ डिसेंबर आहे अखेरची तारीख, 'ही' २ कामं पटापट आटोपून घ्या; केली नाही तर समस्यांना सामोरं जावं लागेल
3
धक्कादायक! SMAT स्पर्धेसाठी निवड न झाल्याच्या रागातून कोचवर जीवघेणा हल्ला; तीन क्रिकेटपटूंवर आरोप
4
शिंदेंचा ‘वाघ’ थेट बिबट्याच्या वेशात विधान भवनात; हात जोडून सरकारला विनवणी, “गेली २० वर्षे...”
5
ममता बॅनर्जींनी केंद्र सरकारच्या आदेशाचा कागद फाडला! कशावरून रंगला 'हाय-व्होल्टेज' ड्रामा?
6
पाकिस्तानात शूट झालाय रणवीर सिंगचा 'धुरंधर'? अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "तिथले गँगस्टर..."
7
माणुसकी संपली! हेल्थ चेकअपमध्ये कॅन्सर झाल्याचे कळले; IT कंपनीने २१ वर्षांचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्याला काढले 
8
'वीर सावरकर पुरस्कार' नाकारला! काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी HRDS इंडियाचा प्रस्ताव फेटाळला; 'सहमतीशिवाय घोषणा केल्याने' वाद
9
Viral Video: अरे, हे चाललंय तरी काय? जोडप्यानं हायवेवर कार बाजूला लावली अन् रस्त्यावरच...
10
२०२६ मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर, भाऊबीजेला अतिरिक्त सुट्टी; सरकारकडून अधिसूचना जारी
11
कोण सरस...? टाटा नेक्सॉन आणि मारुती विक्टोरिसची समोरासमोर टक्कर झाली; दोन्ही ५ स्टार, कोणाची काय हालत...
12
रुपया गडगडल्यामुळे देशात महागाई वाढणार? आयातदारांची चिंता वाढली, RBI आता काय करणार?
13
Silver Price Today: चांदीचा दर विक्रमी उच्चांकावर, किंमत १.९० लाख रुपयांच्या पुढे; आता गुंतवणूक करणं योग्य होईल का?
14
Nana Patole: निवडणूक आयोगाच्या कारभारावर आक्षेप; आयुक्तांना पदावरून हटवण्याची पटोलेंची मागणी
15
याला म्हणतात नशीब! गरिबीशी लढणाऱ्या २ मित्रांचं आयुष्यच बदललं; सापडला ५० लाखांचा हिरा
16
धक्कादायक! लग्नासाठी जमीन विकली; २ वेळा बनला नवरदेव, पण दोन्ही वेळा फसला, चुना लावून वधू पसार
17
टेस्लाला मोठा झटका, VinFast बनली EV मार्केटची 'महाराणी'! आता असा आहे इलॉन मस्क यांच्या फ्यूचर प्लॅन
18
मालवणीतील वादाप्रकरणी मंत्री मंगलप्रभात लोढा आणि आमदार अस्लम शेख यांच्यात शाब्दिक चकमक
19
VIDEO: लग्नमंडपात काकूंचीच हवाsss... नवरा-नवरी वरमाला घालत असताना हवेत ५ राऊंड्स गोळीबार
Daily Top 2Weekly Top 5

इथे स्वागताला भटके ‘श्वानपथक’; मोजून ८ कर्मचारी, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाची दुरवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 10:43 IST

नाट्यगृहातील स्टेजवरील मुख्य पडदा वारंवार बंद पडतो, वातानुकूलन यंत्रणेचा प्लांट २ बंद, डायनिंग रूमधील, पोर्चमधील एसी यंत्रणा पूर्ण बंद आहे, पाण्याची सोय नाही

धनकवडी : बिबवेवाडी येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाची दुरवस्था झालेली नसली, तरीही इथे सुरक्षा कर्मचारी वर्ग अत्यंत तुटपुंजा असल्याने येथील भटक्या ‘श्वानपथका’ वर इथल्या सुरक्षेची जबाबदारी सोपवली आहे की काय, असे खेदाने म्हणावे लागते. विस्तीर्ण अशा परिसरात २० सुरक्षा कर्मचारी अपेक्षित असताना केवळ ८ कर्मचाऱ्यांवर या भव्य नाट्यगृहाची सुरक्षा अवलंबून आहे. 

नाट्य सभागृहाकडून या संदर्भात वेळोवेळी लेखी मागणी करूनही याबाबत कार्यवाही होत नाही. तर विद्युत विभागाकडील कामेही मोठ्या प्रमाणात खोळंबल्याने सांस्कृतिक कार्यक्रम आणि नाट्यप्रयोगांना येणारे रसिक व कलाकारांची नेहमीच गैरसोय होत आहे. विद्युत विभागाला सातत्याने लेखी कळवूनही अनेक कामे प्रलंबित आहेत. त्यात नाट्यगृहातील स्टेजवरील मुख्य पडदा वारंवार बंद पडतो, वातानुकूलन यंत्रणेचा प्लांट २ बंद आहे, डायनिंग रूमधील, पोर्चमधील एसी यंत्रणा पूर्ण बंद आहे, १३ कॅनरा लाइट पॅनेल बंद आहेत, कलादालनाच्या आतील भागातील जिन्यामधील दिवे पूर्ण बंद आहेत, व्हीआयपी रूम व स्टेजजवळ पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही, तेथील एसीही बंद आहे. संपूर्ण नाट्यगृहातील एसी यंत्रणा व्यवस्थित कार्यान्वित नाही, एसीसाठी स्वतंत्र जनरेटर व्यवस्था केलेली नाही. पिण्याच्या पाण्याची अपुरी व्यवस्था तर उपाहारगृहाबाबतची उदासीनता प्रकर्षाने जाणवत आहे. या उणिवांमुळे या नाट्यगृहात वेळोवेळी होणाऱ्या प्रयोगांना येणारे रसिक व कलाकार नाराजी व्यक्त करत आहेत. तर ऐन रंगात येणारे प्रयोग अशा व्यवस्थेकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे बेरंग होत असल्याने सभागृह व्यवस्थापकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

पुण्याचा झपाट्याने विकसित होणारा भाग म्हणजे दक्षिण उपनगर, पूर्वीच्या काळी तुरळक लोकसंख्या आजमितीला लाखोंच्या घरात गेली असून या भागात नाट्यगृह असावे अशी मागणी होत होती, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या मागणीचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि भव्य अशा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहाची उभारणी झाली, आणि येथील नाट्यप्रेमींसह, छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी हे साठे सभागृह वरदान ठरत आहे. मात्र कोथरूड मधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात गेल्या शनिवारी (३१ मे) एका नाटकाचा प्रयोग रंगात आला असतानाच, प्रेक्षागृहात ‘मूषक’ प्रयोगाचे नाट्य रंगले. आणि शहरातील नाट्य सभागृहातील सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता आणि टापटीपपणाचा प्रश्न ऐरणीवर आला.

टॅग्स :PuneपुणेNatakनाटकDhankawadiधनकवडीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाartकलाcultureसांस्कृतिक