शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
3
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
4
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
5
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
6
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
7
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
8
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
9
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
10
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
11
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
12
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
13
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
14
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
15
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
17
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
18
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
19
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
20
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ

थंडीमुळे बहरला स्ट्रॉबेरीचा हंगाम... पुण्यात आवक वाढली; दरामध्ये ३० ते ४० टक्क्यांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 12:53 PM

गेल्या आठ दिवसांपासून चांगली थंडी पडू लागल्याने स्ट्रॉबेरीचा हंगामदेखील बहरात आला आहे. गेल्या काही दिवसांत आवक वाढली असून, गोड अन् चांगल्या दर्जाच्या स्ट्रॉॅबेरीमुळे मागणीदेखील वाढली आहे.

ठळक मुद्देदरवर्षी आॅक्टोबर महिन्याच्या शेवटी स्ट्रॉबेरी बाजारात, परंतु यंदा परतीच्या पावसामुळे हंगाम उशिरामोठी आवक होऊनदेखील मागणी चांगली असल्याने दोन किलोस २०० ते ३०० रुपये भाव

पुणे : राज्यात गेल्या आठ दिवसांपासून चांगली थंडी पडू लागल्याने स्ट्रॉबेरीचा हंगामदेखील बहरात आला आहे. गेल्या काही दिवसांत आवक वाढली असून, गोड अन् चांगल्या दर्जाच्या स्ट्रॉॅबेरीमुळे मागणीदेखील वाढली आहे. मागणी वाढल्याने स्ट्रॉबेरीच्या दरामध्ये ३० ते ४० टक्क्यांची वाढ झाली असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. दरवर्षी आॅक्टोबर महिन्याच्या शेवटी स्ट्रॉबेरी बाजारात दाखल होते, परंतु यंदा परतीच्या पावसामुळे हा हंगाम उशिरा सुरू झाला. त्यात ओखी वादळ व त्यानंतर आलेल्या ढगाळ हवामानाचादेखील स्ट्रॉॅबेरीला फटका बसला. आता मात्र राज्यात सर्वत्र चांगली थंडी पडत असून, या हवामानाचा स्टॉबेरीला फयदा होत आहे. यामुळे स्ट्रॉबेरीचा हंगाम सध्या बहरात आहे़ गेल्या आठवड्यात स्ट्रॉबेरीच्या दोन किलोस १५० ते २०० रुपये दर मिळाला होता. रविवारी (दि. १७)  बाजारात तब्बल चार टन इतकी स्ट्रॉबेरीची आवक झाली. मोठी आवक होऊनदेखील मागणी चांगली असल्याने दोन किलोस २०० ते ३०० रुपये भाव मिळाल्याची माहिती स्ट्रॉबेरीचे व्यापारी अरविंद मोरे यांनी दिली़ पुण्यातील मार्केट यार्डमध्ये प्रामुख्याने महाबळेश्वर, पाचगणी, वाई, भिलार, तसेच जावळी तालुका, तसेच भोर तालुक्यातून काही प्रमाणात स्ट्रॉबेरीची आवक होत आहे़  पुणे बाजारातून गोवा आणि गुजरात राज्यातील व्यापाऱ्यांकडून सर्वाधिक मागणी आहे़  तसेच कोलकाता, कर्नाटक, बंगळुरू, तमिळनाडू, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि दिल्ली येथूनही मागणी वाढली असल्याचे मोरे यांनी नमूद केले़ तसेच घरगुती ग्राहकांसह कँडी, आइस्क्रीम, पल्प सिरप, जेली उत्पादक कंपन्यांकडून स्ट्रॉबेरीला मोठी मागणी आहे़ दरवर्षी बाजारात विंटर, एस़ए़ कॅमेर ओझा, नादीला, आर २, आर १, तसेच स्वीट चार्ली या स्ट्रॉबेरीची आवक होत आहे़ स्ट्रॉबेरीचा हंगाम गेल्या दोन महिन्यांपासून सुरू झाला असून सध्या हंगाम बहरला आहे़ अजून दोन ते अडीच महिने हंगाम सुरू राहील, असे मोरे यांनी सांगितले़.

सफरचंद : एका पेटीमागे ५० रुपयांची वाढकाश्मीर खोऱ्यात बर्फवृष्टी सुरू झाल्याने मार्केट यार्डातील फळ बाजारात सफरचंदाची आवक घटली आहे. परिणामी, सफरचंदाच्या पेटीमागे ५० रुपयांनी वाढ झाली आहे, तर थंडीमुळे आवक वाढल्याने पेरू व बोरांच्या दरात १० ते २० टक्क्यांनी घट झाली. लिंबाचे दर २० टक्क्यांनी वधारले असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. दरम्यान, डाळिंबाची आवक घटली असून दर स्थिर आहेत. 

मार्गशीर्ष संपल्याने फुलांच्या मागणीत घटमार्गशीर्ष व लग्नाच्या भरपूर मुहूर्तामुळे गेले महिनाभर फुलांना चांगली मागणी होती. परंतु मागशीर्ष संपल्यामुळे फुलबाजारात फुलांना मागणी घटली आहे. त्यामुळे फुलांचे भाव तीस ते चाळीस टक्क्यांनी घसरले आहेत. सध्या मार्केट याडार्तील फुल बाजारात जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात फुलांची आवक होत आहे. मात्र, मागणीअभावी हीच परिस्थिती काही दिवस कायम राहील, अशी शक्यता व्यापारी सागर भोसले यांनी व्यक्त केली.  

टॅग्स :market yardमार्केट यार्डPuneपुणे