शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

नवले पुलाजवळ विचित्र अपघात, आठ ते नऊ वाहनांची धडक; वाहतूक विभागाच्या सुचनांकडे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2024 11:35 IST

या विचित्र अपघातात आठ ते नऊ वाहने एकमेकांना धडकली...

- कल्याणराव आवताडे 

धायरी(पुणे) : ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पाठीमागून वाहनांना धडक दिल्याने विचित्र अपघात घडला आहे. या विचित्र अपघातात आठ ते नऊ वाहने एकमेकांना धडकली असून काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असले तरी यातील वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडला. 

मिळालेल्या माहितीनुसार, कात्रजकडून (देहू रस्ता) नवले पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नवले पुलाच्या सिग्नलच्या अगोदर हा विचित्र अपघात घडला. या महामार्गावर एका ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोर थांबलेल्या वाहनाला धडक दिली. त्यामुळे  विचित्र अपघात घडत आठ ते नऊ वाहने एकमेकांना धडकली. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे अंमलदार व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहने बाजूला केली. तसेच जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

वाहतूक विभागाने केलेल्या सूचनेकडे दुर्लक्ष...

नवले पुल चौकातून राष्ट्रीय महामार्ग ६५ व ४८ वरील सर्व्हिस रस्ते जोडले जातात. कात्रज चौक ते नवले पुल हा रस्ता सहा पदरी असून तीव्र उताराचा आहे. नवले चौकात येणारी वाहने वेगात येतात. त्यामुळे बऱ्याच वेळेस सिग्नलला उभे असलेल्या वाहनावर वेग नियंत्रित न झाल्यामुळे ब्रेक न लागल्याने जड वाहनांकडून सिग्नलला उभ्या असलेल्या वाहनांना धडक देऊन गंभीर अपघाताचे प्रकार याआधी घडलेले आहेत. नवले पुलास प्राप्त झालेल्या भौगोलिक उतारामुळे व घडलेल्या अपघातांच्या उपाय योजनेच्या दृष्टीकोनातून खालील उपाय करणे गरजेचे असल्याचे पत्र वाहतूक विभागाचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग वाघमारे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडे दिले होते. मात्र अद्यापपर्यंत त्यावर कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. 

ह्या उपाययोजना करणे आवश्यक...

 १. नवले पुल चौकात आयआरसी नॉर्मप्रमाणे गतिरोधक बसविण्यात यावा, त्यामुळे वाहनाचा वेग कमी होईल.

२. कात्रज ते नवले पुल रस्त्यावर नवले पुल चौकापासून २०० मीटर अलीकडे बाबजी पेट्रोल पंपासमोर व १०० मीटर अलीकडे रम्बलर्स स्ट्रीप्स आखण्यात यावेत. तसेच याठिकाणी सोलार रेड ब्लीकर्स बसविण्यात यावेत.

टॅग्स :Accidentअपघातpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेtraffic policeवाहतूक पोलीस