शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

आईवडिलांना आळंदीला सोडायला निघालेल्या 'त्या' रिक्षाचालकाची 'ही' आहे सत्य कथा..

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2020 6:54 PM

आईवडिलांना आळंदीला सोडणारा तो रिक्षाचालक समाज माध्यमांवर शिव्याशापांचा धनी ठरला होता...

ठळक मुद्देरिक्षा संघटनेने लावला छडा

पुणे: वृद्ध आईवडिलांना आळंदीला सोडायला निघालेल्या रिक्षाचालकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर तो समाजात टीकेचा धनी झाला. त्याच्यासह बहुसंख्य रिक्षाचालक देखील शिव्याशापांचे धनी झाले. मात्र त्या चालकाने तो कोणत्या रिक्षा संघटनेचा सदस्य आहे हेही स्पष्ट केले होते. त्यामुळे त्या रिक्षाचालकाची 'व्यथा' उलगडण्यात यश आले आहे. 

बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर व उपाध्यक्ष श्रीकांत चव्हाण यांनी नावावरून या रिक्षाचालकाचा शोध घेतला. एका खासगी वित्तीय कंपनीकडून कर्ज काढून त्याने रिक्षा घेतली होती. व्यवसाय सुरू होता, बरे चालले होते, मात्र कोरोना टाळेबंदीत त्याचा रिक्षाचा व्यवसाय पूर्ण बंद झाला. घरात खाणारी त्याच्यासह आईवडिल व आठ माणसे. कमावणारा तो एकटाच. सुरूवातीचे काही दिवस शिलकीवर काढले, नंतर मात्र उपासमार होऊ लागली. रिक्षा व्यवसायाला काही अटींवर परवानगी मिळाली तर त्याआधीच त्या कंपनीने कर्जाचे हप्ते थकले म्हणून त्याची रिक्षा ओढून नेली. त्यामुळे  मिळाले काम तर दाम नाहीतर उपास असे त्याचे दिवस सुरू होते. ते त्याच्या आईवडिलांना पाहिले जात नव्हते.

आपला भार कमी व्हावा यासाठी त्यांनी स्वत: होऊनच मग भिक्षा मागून जगणे सुरू केले. ते त्याला पहावत नव्हते. त्याने त्यांना घराच्या परिसरात फिरत नका जाऊन म्हणून सांगितले, मात्र वयामुळे त्यांना ते समजत नव्हते. अखेरीस किमान काही दिवसांपुरते त्यांना आळंदीला सोडून येऊ असा विचार त्याने केला व त्याप्रमाणे तो तिथे गेला. नागरिकांच्या गराड्यात सापडला. खोटे काहीही न बोलता त्याने सगळे खरे सांगितले व समाजमाध्यमात तो टिकेचा धनी झाला. संघटनेच्या सदस्यांनी ही सर्व माहिती मिळाल्यावर त्वरेने हालचाल केली. त्याला आर्थिक मदत मिळवून दिली. वित्तीय कंपनीबरोबर संपर्क साधून रिक्षा परत आणली.

कोरोना टाळेबंदी काळात अनेकांवर अशी उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच कर्जदार व्याजाच्या हप्त्यांसाठी त्यांच्यावर जुलूम जबरदस्ती करत आहेत. सरकारने किमान या कंपन्यांच्या बेमुर्वतपणाला आळा घालावा अन्यता अशा घटनांचे प्रकार वाढतील अशी भीती संघटनेने या सर्व प्रकारावर व्यक्त केली. 

टॅग्स :Puneपुणेauto rickshawऑटो रिक्षाParenting Tipsपालकत्वAlandiआळंदीSocial Mediaसोशल मीडिया