शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी रास्ता रोको!

By admin | Updated: August 24, 2015 02:53 IST

बारामतीच्या जिरायती भागातील लोणी भापकरसह २२ गावांत पुरंदर योजनेचे पाणी सोडावे, चारा डेपो सुरू करावेत, या मागण्यांसाठी सुरू असलेल्या उपोषणाच्या आंदोलनाच्या

लोणी भापकर : बारामतीच्या जिरायती भागातील लोणी भापकरसह २२ गावांत पुरंदर योजनेचे पाणी सोडावे, चारा डेपो सुरू करावेत, या मागण्यांसाठी सुरू असलेल्या उपोषणाच्या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी येथील हजारो ग्रामस्थांनी लोणी पाटी येथे रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाची व्याप्ती वाढविण्याचा इशारा या वेळी आंदोलनकर्त्यांनी दिला. पाणी, चारा व रोजगार टंचाईने बारामतीचा जिरायती भागात सध्या घायकुतीला आला आहे. पुरंदर उपसा योजना तातडीने कार्यान्वित करावी. तसेच पशुधन वाचविण्यासाठी चारा डेपो सुरू करावेत, या मागण्यासाठी लोणी भापकरसह २२ गावांनी दि. २१ आॅगस्टपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशीही प्रशासनाचा प्रतिसाद थंडच राहिल्याने हजारो महिला, पुरुष ग्रामस्थांनी एकत्र येत रविवारी लोणी पाटी येथे रास्ता रोको आंदोलन सुरू केले. सुमारे दोन तास बैलगाड्या, मेंढरांसह रस्त्यावर ग्रामस्थांनी तळ ठोकला होता. यावेळी शेतकरी कृती समितीचे सतिश काकडे, राष्ट्रीय समाज पक्षाचे दशरथ राऊत, पंचायत समितीचे माजी सदस्य दत्तात्रय ढोले, भीमराव पवार, दिलीप जगदाळे, वैष्णवी भापकर, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी शेरे, भापकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अ‍ॅड. विक्रमसिंह दांगडे पाटील, बाळासाहेब पोमणे तर उपोषणकर्त्यांच्या वतीने हनुमंतराव भापकर यांची भाषणे झाली. यावेळी प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार अनिल ठोंबरे यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सतीश शिंदे, गजभारे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.तहसीलदार किंवा प्रांत अधिकारी यांनीच यावे व निवेदन स्वीकारावे, असा पवित्रा आंदोलकांनी घेतल्यानंतर काही काळ तणाव निर्माण झाला होता. परंतु, दत्तात्रय ढोले, अरविंद गायकवाड, हनुमंत भापकर, मुरलीधर ठोंबरे इादरेनर सांमजस्याची भूमिका घेतली व तणाव निवळला. सलग दुसऱ्या वर्षी उपोषण, आंदोलन करूनही शासन उदासीन राहणार असेल तर आंदोलनाची व्याप्ती वाढविण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला.