शहरं
Join us  
Trending Stories
1
बुद्धिबळपटू तनिषा बोरामणिकरने बारावीत मिळवले १०० टक्के; पुढचे टार्गेट CA, त्यानंतर UPSC
2
निकालानंतर उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत जातील?; शरद पवारांचं मोठं विधान
3
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
4
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
5
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
6
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
7
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
8
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
9
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
10
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
11
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
12
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध
13
Gold Price Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोन्याचे दर पुन्हा घसरले
14
महेंद्रसिंग धोनी आम्हाला कळवेल...! कॅप्टन कूलच्या निवृत्तीच्या चर्चांवर CSK ने दिले महत्त्वाचे अपडेट्स
15
PM मोदींच्या वक्तव्यानंतर सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी, कोल इंडियाबाबत ब्रोकरेज बुलिश, म्हणाले...
16
T20 WC 2024: "रिंकू एकमेव खेळाडू आहे जो...", 'भज्जी'ने टीम इंडियासाठी सांगितली रणनीती
17
Closing Bell: शेअर बाजाराचं मार्केट कॅप $५ ट्रिलियन पार; मेटल शेअर्समध्ये तेजी, बँक-आयटी घसरले
18
एका सेक्स वर्करमुळं २११ ग्राहकांची झोप उडाली; पोलीस करतायेत प्रत्येकाला कॉल
19
हिंदी सोडा 'या' साऊथ अभिनेत्याकडे आहे कोट्यवधींची संपत्ती, बुर्ज खलिफामध्ये फ्लॅट अन्...
20
२५ वर्षात किती बदलले 'सूर्यवंशम'चे कलाकार; अभिनेत्रीचा मृत्यू, छोटा भानू प्रताप काय करतो?

तब्बल साडेआठ तासांच्या अथक प्रयत्नातून थांबली जलवाहिनीची गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 7:19 PM

गळती होत असलेल्या जलवाहिनीचे काम प्राधान्याने व्हावे यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न चालवले होते, मात्र, वाहिनीतून पाणी जात असल्याने काम करता येणे शक्य होत नव्हते.

ठळक मुद्दे तीन ठिकाणी फुटलेली वाहिनी केमिकलचा लेप लावून सिमेंटने बुजवली.

पुणे : एसएनडीटी महाविद्यालयाजवळ च्या जलवाहिनीला गळती लागली होती. १२०० एमएमच्या एमएसलाईनला वर्तुळाकार छिद्र पाडून त्यातून काही कर्मचारी ६० मीटर लांब आत चालत गेले. त्यांना तीन ठिकाणी वाहिनी फुटलेली आढळली. त्यावर केमिकलचा लेप लावून सिमेंटने ती छिद्र बुजवण्यात आली. सकाळी ११ वाजता सुरू झालेले काम रात्री साडेआठ वाजता संपले व रोज लाखभर लिटर पाणी वाया जात होते ते वाचले. नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे यांच्या प्रभागात एसएनडीटी महाविद्यालयाजवळ ही गळती होत होती. हे काम प्राधान्याने व्हावे यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न चालवले होते, मात्र, वाहिनीतून पाणी जात असल्याने काम करता येणे शक्य होत नव्हते. आयुक्त सौरव राव यांनी दिवाळीपुर्वी या ठिकाणाला भेट दिली. त्यांनी दिवाळीनंतर हे काम करण्याचे आश्वासन दिले होते. गुरूवारी या भागाचा पाणी पुरवठा बंद असल्यामुळे वाहिनी कोरडी होती. त्यामुळे काम करता आले व गळती थांबली. सहस्त्रुबद्धे म्हणाल्या,१२०० एमएमच्या एमएसलाईनला वर्तुळाकार छिद्र पाडून त्यातून काही कर्मचारी ६० मीटर लांब आत चालत गेले. त्यांना तीन ठिकाणी वाहिनी फुटलेली आढळली. त्यावर केमिकलचा लेप लावून सिमेंटने ती छिद्र बुजवण्यात आली. या कर्मचाऱ्यांना आत काम करता यावे व श्वास घेताना त्रास होऊ नये. यासाठी आत दिवा व प्राणवायूच्या दोन ट्यूब सोडण्यात आल्या होत्या. सकाळी ११ वाजता सुरु झालेले हे काम अखेर रात्री साडेआठ वाजता पुर्ण झाले. पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता व्ही. जी. कुलकर्णी, अधीक्षक अभियंता प्रवीण गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली अभियंता गजभिये यांनी हे काम पूर्ण केले. महाविद्यालयाच्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी, डॉ. देवरे, सोळंकी व सर्व सुरक्षा कर्मचाऱ्यांनी कामासाठी साह्य केले. पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर हे वाया जाणारे पाणी वाचवता आले याचे समाधान असल्याचे सहस्त्रबुद्धे म्हणाल्या. 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाSaurabh Raoसौरभ राव