शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

कैऱ्या पाडण्यासाठी झाडाला दगड मारला; वऱ्हाडी मंडळीवर मधमाशांनी हल्ला केला, जुन्नरमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 15:27 IST

लग्नमूहूर्त प्रसंगी लग्नमंडपाच्या परिसरात असलेल्या एका घराशेजारील झाडाला कैऱ्या पाडण्यासाठी अज्ञात व्यक्तीने दगड मारला

नारायणगाव : जुन्नरच्या पश्चिम पट्ट्यातील आदिवासी भागात असलेल्या खडकुंबे गावातील लग्नसोहळ्यात आग्या मोहळातील मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात १९ वऱ्हाडी जखमी झाले. या जखमींमध्ये ३ लहान मुलांचा समावेश असून त्यातील एक बालक गंभीर जखमी झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी ( दि. ०६ ) दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

दरम्यान ,१९ जखमी पैकी १० जण जुन्नर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करून ७ जणांवर उपचार करुन सोडण्यात आले आहे. तर ७ जण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. मधमाशांच्या हल्ल्यात जखमींमध्ये ३ लहान मुलांचा समावेश आहे. त्यातील एक बालक गंभीर जखमी झाल्याने, त्याला पुढील उपचारासाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे, अशी माहिती  डॉ. राहुल सरदे यांनी सांगितले. तसेच ९ जणांना उपचारासाठी डॉ. माऊली रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील दोघांना उपचारानंतर सोडून देण्यात आले तर ७ जणांना उपचासाठी ॲडमिट करण्यात आल्याची माहिती डॉ. राहूल पवार यांनी दिली.

 जुन्नरच्या पश्चिम पट्ट्यातील नाणेघाट मार्गावरील खडकुंबे गावातील मुलगी तसेच केवाडी येथील मुलगा यांचा शुभविवाह खडकुंबे येथे होता. लग्नमूहूर्त प्रसंगी लग्नमंडपाच्या परिसरात असलेल्या एका घराशेजारील झाडाला कैऱ्या पाडण्यासाठी अज्ञात व्यक्तीने दगड मारला. झाडावर असलेल्या मधपोळ्यातील माशा उठल्या आणि माशांनी वऱ्हाडींना लक्ष्य केले. बचावासाठी वऱ्हाडी पळत सुटल्याने माशांनी मंडपात शिरकाव करीत अनेकांना चावे घेतले. या घटनेत १९ जण जखमी झाले, या घटनेने वऱ्हाडी मंडळीनी लग्नसोहळा आटोपता घेतला.

दरम्यान मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या अनेकांना जशी वाहनाची व्यवस्था होईल त्या पद्धतीने उपचारासाठी जुन्नरला आणण्यात आले. जखमींपैकी ९ जणांना उपचारासाठी डॉ.राहूल पवार यांच्या माऊली रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.त्यातील दोघांना उपचारानंतर सोडून देण्यात आले तर ७ जणांना उपचासाठी ॲडमिट करण्यात आल्याचे डॉ.पवार यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेJunnarजुन्नरmarriageलग्नHealthआरोग्यhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरSenior Citizenज्येष्ठ नागरिक