दारुसाठी पैसे न दिल्याने डोक्यात मारला दगडी पाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 19:17 IST2020-02-26T19:16:44+5:302020-02-26T19:17:56+5:30
फिर्यादी कुंदन गायकवाड यांच्याकडे दारुसाठी पैशांची मागणी केली. गायकवाड यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर आरोपी किरण मोरे याने मसाला वाटण्याचा दगडी पाटा फिर्यादी गायकवाड यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले.

दारुसाठी पैसे न दिल्याने डोक्यात मारला दगडी पाटा
पिंपरी : दारुसाठी पैसे न दिल्याने मसाला वाटण्याचा दगडी पाटा डोक्यात मारून तरुणाला जखमी केले. लालटोपीनगर, मोरवाडी, पिंपरी येथे सोमवारी (दि. २४) साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली.
कुंदन उमेश गायकवाड (वय १९, रा. लालटोपीनगर, मोरवाडी, पिंपरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. किरण महिंद्रा मोरे (वय २४, रा. लालटोपी नगर, पिंपरी) व सोमनाथ (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी संगणमत करून फिर्यादी कुंदन गायकवाड यांच्याकडे दारुसाठी पैशांची मागणी केली. गायकवाड यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर आरोपी किरण मोरे याने मसाला वाटण्याचा दगडी पाटा फिर्यादी गायकवाड यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.