शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

रिक्षाच्या डिक्कीतून दागिने लंपास :दोन लाख 82 हजार पाचशे रुपयांचा ऐवज लांबविला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 17:16 IST

दोन चोरीच्या घटनेत चोरट्यांनी दोन लाख 82 हजार पाचशे रुपयांचा ऐवज लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला. प्रवासाच्या वेळी रिक्षाच्या डिक्कीत ठेवलेल्या बॅगमधून दोघांनी एक लाख 37 हजार पाचशे रुपयांचे दागिने लांबविले.

 पुणे:  दोन चोरीच्या घटनेत चोरट्यांनी दोन लाख 82 हजार पाचशे रुपयांचा ऐवज लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला. प्रवासाच्या वेळी रिक्षाच्या डिक्कीत ठेवलेल्या बॅगमधून दोघांनी एक लाख 37 हजार पाचशे रुपयांचे दागिने लांबविले. दुस-या एका घटनेत स्वारगेट ते तळा या एस.टी बसमध्ये चढत असताना एका महिलेच्या छोट्या पाऊच मधून आठ हजारांची रोकड व सोन्याचे दागिन्यांचा  1 लाख 45 हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरला.  

याप्रकरणी अरविंद कसबेकरट (वय-69,रा.बालाजीनगर कुमठानाका सोलापुर) यांनी दिलेल्या फियार्दीवरून दोन अनोळखी व्यक्तींच्या विरुद्ध  स्वारगेट पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी कसबेकरट हे स्वारगेट ते आंबेगाव असा रिक्षाने प्रवास करत होते. यावेळी त्यांनी आपल्याकडील बॅग रिक्षाच्या डिक्कीत ठेवली होती. यावेळी दोन अनोळखी व्यक्तींनी संगनमत करून फिर्यादीच्या बॅगमधून सोन्याचे दागिने लंपास केले.  तर दुस-या घटनेत मिना सुभाष जाधव (वय-38 रा. इंदापूर, ता.माणगाव जि.रायगड ) यांनी  दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला या स्वारगेट येथून तळा या बसमध्ये चढत होत्या. यावेळी गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी  छोट्या पाऊच मधून रोकड व सोन्याचे दागिने असा 1 लाख 45 हजारांचा ऐवज चोरी केला. पुढील तपास स्वारगेट पोलिस करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसtheftचोरी