शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

जिल्हा न्यायालय परिसरातून वर्षभरात २० दुचाकी चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 13:29 IST

जिल्हा न्यायालयात येणा-या व्यक्तींसाठी गेटनंबर १ व ३ बाहेर रेल्वे ट्रॅकच्या बाजुला दुचाकी व चार चाकी वाहनांसाठी पार्कींगची सोय आहे.

ठळक मुद्देवाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न एैरणीवर, पक्षकार व वकील धास्तावले वाहने ज्या ठिकाणी पार्क होतात त्याठिकाणी सीसीटीव्हीची संख्या अतिशय नगण्य न्यायालय परिसरात असलेली पार्किंगची जागा देखील अपुरी

पुणे : विविध कामांसाठी शिवाजीनगर जिल्हा न्यायालयात येणा-या पक्षकार व वकिलांच्या वर्षभरात सुमारे २० दुचाकी चोरीला गेल्याचे प्रकार घडले आहेत. शिवाजीनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून ही बाब समोर आली आहे. विविध खटल्यांच्या कामासाठी तसेच वकिली करण्यासाठी जिल्हा भरातून नागरिक याठिकाणी दाखल होत असतात. न्यायालयात येणा-या व्यक्तींसाठी जिल्हा न्यायालयात व गेटनंबर १ ते ३ बाहेर रेल्वे ट्रॅकच्या बाजुला दुचाकी व चार चाकी वाहनांसाठी पार्कींगची सोय आहे. न्यायालयातील सर्व गेटवर सीसीटीव्ही बसविण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्ष वाहने ज्या ठिकाणी पार्क होतात. त्याठिकाणी सीसीटीव्हीची संख्या अतिशय नगण्य आहे. मुळात अन्याय  झालेले अनेक लोक याठिकाणी येतात. त्यात वाहने चोरीला गेल्यास त्यांचा मनस्ताप वाढत आहे. एक प्रकरण संपत नाही तेच दुसरी समस्या उभी राहिल्याची भावना त्यांच्यात निर्माण होत आहे. दरम्यान सध्या न्यायालय परिसरात असलेली पार्किंगची जागा देखील अपुरी आहे. त्यामुळे पक्षकार व वकील मिळेल जागा मिळेल त्या ठिकाणी वाहने लावतात. त्यामुळे न्यायालयाच्या आत व बाहेर देखील वाहतूक कोंडी होत असते. त्यात न्यायालयात लोकअदालत किंवा इतर काही कार्यक्रम असल्यास पार्किंगची समस्या निर्माण होत असते. त्यामुळे पार्किंगची जागा वाढवून त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर आवश्यक सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी वकील व पक्षकार करत आहेत. सीसीटीव्ही कॅमे-यांची संख्या वाढवणे गरजेचे : न्यायालयाच्या बाहेर पार्क करण्यात येणा-या गाड्यांच्या ठिकाणी एकही सीसीटीव्ही कॅमेरा नाही. त्यामुळे त्या वाहनांवर कोणताही वॉच नाही. याचाच फायदा घेत चोरटे गाड्या चोरत असल्याचे प्रकार होत आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सीसीटीव्ही कॅमे-यांची संख्या वाढवणे गरजेचे आहे. यापूर्वीही चोरीच्या घटना : कोर्टरूममधून फाइल चोरीला जाणे, नळ चोरीला जाण्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोर्टाची सुरक्षाव्यवस्था भक्कम करण्यासाठी उपाययोजना राबविण्याची मागणी वकील आणि पक्षकारांकडून अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. कोर्टातील सुरक्षाव्यवस्था अपुरी असल्याचा फटका पक्षकारांनाही बसत आहे. काही वर्षांपूर्वी कोर्टाच्या आवारात खून झाल्यामुळे तेथे पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला होता. मात्र, हा बंदोबस्तही सध्या कमी पडत आहे.  ..................न्यायालयाच्या बाहेर पार्क करण्यात येणा-या वाहनांवर कोणाचेही नियंत्रण नाही. त्याठिकाणी कोणीही वाहन लावून जाते. तसेच तेथे पे अ‍ॅन्ड पार्क नसल्याने जास्त सुविधा देखील पुरविता येत नाही. त्यामुळे चोरीला गेलेल्या वाहनांमध्ये बाहेर पार्क असलेल्यांची संख्या जास्त आहे. तरी देखील असे प्रकार टाळण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. प्रकाश सहा, पोलीस निरीक्षक, कोर्ट चौकी

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयtwo wheelerटू व्हीलरtheftचोरीPoliceपोलिसParkingपार्किंग