शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
2
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
3
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
4
हृदयद्रावक! खेळताना प्लास्टिकचा बॉल गिळला; दीड वर्षांच्या लेकीचा पालकांसमोर तडफडून मृत्यू
5
"माझा मुलगा मानव ठणठणीत आहे...", मुलाच्या आत्महत्येची खोटी बातमी पसरवणाऱ्यांवर संतापली रेशम टिपणीस
6
मुंबईतील तरुणीवर अलिबागमध्ये बलात्कार, पार्टीनंतर ऑफिसमधील सहकाऱ्यानेच केला घात; पीडितेसोबत काय घडलं?
7
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
8
पालकांनो लक्ष द्या! मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी 'ही' SIP ठरेल गेम चेंजर!
9
मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत...
10
SEBI ची मोठी कारवाई, शेअर बाजारात या कंपनीला बंदी; ₹४८४३ कोटींचा नफाही होणार जप्त
11
Viral Video: इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याचा व्हिडीओ पाहून अंगाचा थरकाप उडेल!
12
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचे एअर इंडियावर गंभीर आरोप, कंपनीनं दिलं असं स्पष्टीकरण
13
Sonam Raghuwanshi : "मला सतत वकिलांचे फोन येताहेत, पण माझी एक अट..."; सोनमच्या भावाने स्पष्टच सांगितलं
14
AI म्हणालं, चूप, तुझं अफेअर उघड करीन! एआय माॅडेलच्या या धमकीनं साऱ्यांनाच धडकी भरली
15
महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता; मोदी सरकार कर्मचाऱ्यांना देऊ शकतं मोठं गिफ्ट
16
टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले!
17
छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिरासमोर कारने ६ जणांना उडवलं, एकाचा मृत्यू
18
तरुण दिसण्यासाठी भारतीय लाखो रुपये उधळतायेत? ग्लुटाथिओनची किंमत पाहून धक्का बसेल!
19
IND vs ENG: भारताने इंग्लंडच्या 'बॅझबॉल'ची काढली हवा, नवा रेकॉर्ड बनवला; पाकिस्तानला टाकले मागे
20
पंतप्रधान कमलांसह 38 मंत्री, 4 खासदार; PM मोदींच्या स्वागतासाठी पूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर दाखल

भाग्यश्री सुडेचा खून करण्यासाठी खरेदी केलेले स्टीकिंग टेप आणि कर्टन्स पोलिसांकडून जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 09:34 IST

भाग्यश्री सुडेचा मृतदेह खडडा खोदून पुरण्यासाठी वापरलेले टिकाव व फावडे जप्त करण्यात आले

पुणे : वाघोली परिसरात अभियांत्रिकीच्या तिस-या वर्षात शिक्षण घेणा-या भाग्यश्री सुडे हिचा खून करण्यासाठी आरोपींनी वापरलेला स्टिकीन्ग टेप आणि कारच्या काचांना लावण्यासाठी खरेदी केलेले काळ्या रंगाचे मॅग्नेटिक कर्टन्स कुठून खरेदी केले आहेत ती ठिकाणे आरोपींनी दाखविली आहे. तसेच तिचा मृतदेह खडडा खोदून पुरण्यासाठी वापरलेले टिकाव व फावडे जप्त करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमृत बिराजदार यांच्या न्यायालयात दिली. न्यायालयाने आरोपींच्या पोलीस कोठडीत सहा दिवसांची वाढ केली आहे.

शिवम माधव फुलवळे ( वय २१ रा. वाघोली पुणे मु.रा नांदेड) , सुरेश शिवाजी इंदुरे (वय २३ रा. सकनूर ता मुखेड नांदेड) व सागर रमेश जाधव (रा. हलकी ता. शिरोळा लातूर) या तिघांना तरुणीच्या खुनाच्या गुन्हयात अटक करण्यात आली आहे. या तिघांची पोलीस कोठडीची मुदत सोमवारी (दि. १५) संपल्याने त्यांना तपास अधिकारी सर्जेराव कुंभार यांनी न्यायालयात हजर केले .यावेळी सरकारी वकील रेणुका देशपांडे -कर्जतकर यांनी युक्तिवाद केला की तरुणीच्या खुनानंतर तिच्या अंगावरील सोन्याची अंगठी, कानातील दोन टॉप्स, व एक मित्राकडे ठेवलेले पेंडल जप्त करण्यात आले आहे. तसेच आरोपींनी गुन्हयात वापरलेली किया सेलटॉस कारची तपासणी करण्यात आली. त्यात तिचे केसाचे नमुने, लाईटर आणि रक्ताचे नमुने हे सॅम्पल्स देखील जप्त करण्यात आले आहेत. तसेच मायाताचा व्हिसेरा तपासणी होऊन अभिप्राय मिळवण्यासाठी न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा यांच्याकडेपाठविविण्यात आला आहे. आरोपींनी तिच्या मोबाईल मधील सिमकार्ड काढून तिच्या ते दुस-या मोबाईल मध्ये टाकून त्याद्वारे मयत मुलीच्या पालकांना धमकीचे व नऊ लाख रुपयांच्या खंडणीचे मेसेज करण्यात आले. हा गुन्हा उच्चशिक्षण घेत असलेल्या तरुण मुलांनी खंडणी आणि खुनासाठी अपहरण करून खून केल्याचा गंभीर गुन्हा आहे. त्यांचे इतर साथीदार कोना आहेत? आणखी कोणत्या हत्याराचा वापर त्यांनी केला आहे. याचा तपास करण्यासाठी त्यांची पोलीस कोठडी देण्याची मागणी त्यांनी केली. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींना दि. २० एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसMPSC examएमपीएससी परीक्षाWomenमहिलाDeathमृत्यूCourtन्यायालय