शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

३५ हजार कुत्र्यांची नसबंदी

By admin | Updated: February 5, 2015 00:23 IST

शहरातील कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केल्यापासून गेल्या ५ वर्षांत ३५ हजार कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

पुणे : शहरातील कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केल्यापासून गेल्या ५ वर्षांत ३५ हजार कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील कुत्र्यांच्या प्रजनन दरात मोठी घट झाली आहे. मात्र, सध्या शहरात असलेल्या भटक्या कुत्र्यांचे आयुष्यमान विचारात घेता त्यांच्या त्रासापासून सुटका करण्यासाठी ३ ते ४ वर्षे वाट पाहावी लागणार आहे.भटक्या कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागत असल्याच्या असंख्य तक्रारी होत्या. महापालिकेच्या मुख्यसभेतही यावर अनेकदा चर्चा झाली होती. मात्र, कायद्यानुसार भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यावर अनेक निर्बंध असल्याने त्यावर मर्यादा येत होत्या. त्यानुसार कुत्र्यांना मारता येत नाही इतकेच नाही, तर त्यांना एका ठिकाणाहून उचलून दुसऱ्या ठिकाणी सोडताही येत नाही. यापार्श्वभूमीवर भटक्या कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया करून त्यांना पुन्हा जेथून उचलले तिथे नेऊन सोडणे एवढेच प्रशासनाला करता येणे शक्य होते. त्यानुसार पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने २०१० पासून कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात करण्यात आली. पहिल्या२०१०-११ या वर्षात ६ हजार कुत्र्यांवर शस्त्रक्रिया झाली, त्यानंतर २०११-१२ मध्ये ९ हजार, २०१२-१३ मध्ये ८ हजार, २०१३-१४ मध्ये १० हजार कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आली. वर्षेशस्त्रक्रिया२०१०-११५७२०२०११-१२८८२५२०१२-१३८३८०२०१३-१४१००००२०१४-१५(जाने.)२२००एकूण३५१२५४शहरातील भटक्या कुत्र्यांची नेमकी संख्या किती, याबाबत निश्चित आकडेवारी उपलब्ध नसली, तरी साधारणत: निम्म्यापेक्षा जास्त कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्यात प्रशासनाला यश आले आहे. ४त्यामुळे शहरातील कुत्र्यांच्या प्रजनन दरात मोठी घट झाली आहे. कुत्र्यांच्या पिलांची संख्या कमी झाली आहे. ४कुत्री साधारणत: १५ ते २० वर्षे जगतात, त्याचा विचार करता भटक्या कुत्र्यांचा त्रास कमी होण्यासाठी आणखी ३ ते ४ वर्षे वाट पाहावी लागणार आहे.४सध्या भटक्या कुत्र्यांवर नायडू हॉस्पिटल व केशवनगर येथील ब्ल्यू क्रॉस सोसायटीच्या केंद्रात नसबंदी शस्त्रक्रिया केली जात आहे. तिथे एका दिवसात सरासरी ३५ ते ४० कुत्र्यांवर शस्त्रक्रिया केली जाते. येत्या काही दिवसांत बाणेर, कोंढवा येथे आणखी हॉस्पिटल उभारले जाणार असून, त्यामुळे भटक्या कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्याच्या क्षमतेमध्ये मोठी वाढ होणार आहे,अशी माहिती सहायक आरोग्यप्रमुख अंजली साबणे यांनी दिली.