शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
2
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
3
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
4
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
5
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
6
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
7
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
8
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
9
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
10
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
11
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
12
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
13
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
14
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
15
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
16
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
17
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
18
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
20
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड

पुण्यात लवकरच महाराणा प्रताप यांचा अश्वारुढ पुतळा : मुक्ता टिळक 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2019 11:36 AM

‘शौर्य, धैर्य, त्याग, भक्ती यांचे प्रतीक असलेले आणि भारताचे भूषण म्हणजे महाराणा प्रताप...

ठळक मुद्देमहाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त दुष्काळग्रस्त भागात चारा वाटप उपक्रमगणेश पेठेपासून महाराणाप्रताप उद्यानापर्यंत बाईक रॅलीचे आयोजन

पुणे : शहरातील रजपूत समाजाचे प्रश्न सोडवण्याचे काम महानगरपालिकेकडून केले जाईल. महाराणा प्रताप यांचे नाव असलेल्या दूधभट्टीच्या ठिकाणी महाराणा प्रताप यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यासंदर्भात तेथील नगरसेवकांनी प्रस्ताव दिला आहे. तो प्रस्ताव पक्षनेते सभेसमोरून कला संचलनालयाकडे गेला आहे. त्याची मान्यता आल्यावर हा पुतळा लवकरात लवकर बसवण्यात येईल. तसेच महाराणा प्रताप बागेची देखील आम्ही अधिक चांगली नैसर्गिक पुनर्रचना करत आहोत. त्याचा एक मास्टर प्लॅन या वर्षात तयार करून पुढील दोन वर्षांमध्ये या ठिकाणी अधिकाधिक लोकांना चांगल्या सुविधा कशा मिळतील हे पाहणार आहोत, असे आश्वासन महापौर मुक्ता टिळक यांनी दिले. समस्त राजपुत समाज अंकित राजपुत सोशल वॉरिअर्स या संस्थेने महाराणा प्रताप यांच्या ४७९ व्या जयंतीनिमित्त मिरवणुकीचा खर्च टाळून पुणे जिल्हयातील दुष्काळग्रस्त भागातील जनावरांच्या चारा छावण्यांना चारा वाटप करण्यासाठी पुढाकार घेतला. या उपक्रमाचा शुभारंभ टिळक यांच्या हस्ते थोरले बाजीराव रस्त्यावरील महाराणा प्रताप उद्यान येथे करण्यात आला. कार्यक्रमाला अ‍ॅड. प्रताप परदेशी, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किशोर रजपुत, शैलेश बढाई, गोपी पवार, राजेंद्र परदेशी, सुरेंद्र काची, मनीष साळुंके, सुनील परदेशी, सुरेश ठाकुर, रतन किराड, शेखर हराडे, सोमनाथ परदेशी, गोपीनाथ परदेशी उपस्थित होते. पुणे परिसरातील दौंड, शिरुर या दुष्काळी भागातील चारा छावण्यांना दहा ट्रक चारा वाटप केले जाणार आहे. तसेच यावेळी हिंदू राजपूत समाज, पुणे अंतर्गत राजपूत महिला युवक मंडळातर्फे गणेश पेठेपासून महाराणाप्रताप उद्यानापर्यंत बाईक रॅलीचे आयोजन केले होते. यामध्ये ५५ महिलांनी सहभाग घेतला होता. टिळक म्हणाल्या, ‘शौर्य, धैर्य, त्याग, भक्ती यांचे प्रतीक असलेले आणि भारताचे भूषण असलेले असे महाराणा प्रताप. त्यांचे कष्ट आणि त्याग याची आठवण आपण ठेवायची आहे. आपल्या देशातील प्रत्येक सैनिक हा महाराणा प्रताप आहे. कारण तोच आदर्श, देशाप्रती असलेली भावना आणि प्राण जातील पण माज्या देशाची इंचभर जमीन देखील शत्रूच्या ताब्यात जाणार नाही. असा आदर्श महाराणा प्रताप यांनी घालून दिला, याचेच पालन आपला प्रत्येक सैनिक करतो.’

टॅग्स :PuneपुणेMukta Tilakमुक्ता टिळकPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका