आरपीआयचे राज्यव्यापी अधिवेशन २७ मे रोजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 19:39 IST2018-05-15T19:39:04+5:302018-05-15T19:39:04+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रमुख आरपीआयच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हे अधिवेशन होणार आहे.

The state session of RPI on 27th May | आरपीआयचे राज्यव्यापी अधिवेशन २७ मे रोजी

आरपीआयचे राज्यव्यापी अधिवेशन २७ मे रोजी

ठळक मुद्देकोरेगाव-भिमा दंगल प्रकरणी संभाजी भिडे यांच्याविषयीची भूमिका अशा विविध मुद्द्यांवर अधिवेशनात चर्चा

पुणे : रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे राज्यव्यापी अधिवेशन येत्या रविवारी (दि. २७) प्रादेशिक परिवहन विभागा (आरटीओ) जवळील एसएसपीएमएसच्या मैदानावर होणार आहे. सायंकाळी ४ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल. 
रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या युवक आघाडीचे राज्य सरचिटणीस डॉ. विजय मोरे यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. युवक आघाडीचे महासचिव बाळासाहेब जानराव, युवक आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष परशुराम वाडेकर, जिल्हा युवती अध्यक्ष प्रियदर्शिनी निकाळजे, शहर युवक आघाडीचे अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण या वेळी उपस्थित होते. 
अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी, मराठा, मुस्लिम, धनगर, लिंगायत आरक्षण, कोरेगाव-भिमा दंगल प्रकरणी संभाजी भिडे यांच्याविषयीची भूमिका, सुक्षित बेरोजगार युवकांना दरमहा ५ हजार बेकार भत्ता, लहुजी वस्ताद साळवे यांचे संगमवाडी येथील स्मारक अशा विविध मुद्द्यांवर अधिवेशनात चर्चा करण्यात येणार आहे.  


 

Web Title: The state session of RPI on 27th May