सविता गवारे यांना राज्यस्तरीय कृषिरत्न पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:06 IST2021-02-05T05:06:58+5:302021-02-05T05:06:58+5:30
सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने शिर्डी येथे शेतातील विविध उपक्रमाबद्दल सविता नवनाथ गवारे यांना राज्यस्तरीय कृषिरत्न पुरस्कार ...

सविता गवारे यांना राज्यस्तरीय कृषिरत्न पुरस्कार
सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने शिर्डी येथे शेतातील विविध उपक्रमाबद्दल सविता नवनाथ गवारे यांना राज्यस्तरीय कृषिरत्न पुरस्कार अखिल भारतीय सरपंच सेवा संघाचे सरचिटणीस बाबासाहेब पावसे,खासदार सदाशिव लोखंडे,आदर्श सरपंच पोपटराव पवार,यादवराव पावशे यांच्या हस्ते देण्यात आला.
या वेळी समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख,विठ्ठलवाडीचे माजी सरपंच कांतीलाल गवारे, माजी उपसरपंच सोपानराव गवारे,बाळासाहेब गवारे,मधुकर दोरगे आदी मान्यवर उपस्थित होते. सविता गवारे यांनी विठ्ठलवाडी-भोसेवस्ती येथे शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान राबवून शेतामध्ये उल्लेखनीय उपक्रम राबवून अल्प खर्चात पिकांचे भरघोस उत्पन्न घेतले आहे. सविता गवारे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल आमदार अशोक पवार यांनी अभिनंदन केले आहे.
राज्यस्तरीय कृषिरत्न पुरस्कार बाबासाहेब पावसे यांच्या हस्ते स्वीकारताना सविता गवारे