शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ४२ लाख सातबारे झाले डिजिटल स्वाक्षरीयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 17:21 IST

शेतकऱ्यांना सात-बारा उतारा मिळणे सोयीचे जावे या साठी सरकारने १ मे पासून डिजिटल सातबारा उतारा देण्याची घोषणा केली होती. मात्र, जून आणि जुलै महिन्यात तांत्रिक अडचणीमुळे राज्यातील सर्व्हर ठप्प पडले होते.

ठळक मुद्देतिढा सर्व्हरचा : दहा दिवसांत पावणेतीन लाख सातबारा उताऱ्यांवर कामराज्यातील १० लाख नागरिकांनी या डिजिटल सेवेचा फायदा राज्यात १८ जुलै पर्यंत १ लाख ४१ हजार डिजिटल स्वाक्षरी असलेले सातबारा वितरीत

पुणे : शेतकऱ्यांना सात-बारा उतारा मिळणे सोयीचे व्हावे या साठी सुरु केलेल्या डिजिटल मोहीमेअंतर्गत राज्यातील अडीच कोटी सातबारा उताऱ्यांपैकी तब्बल ४२ लाख सात-बारा उतारे डिजिटल स्वाक्षरीयुक्त झाले आहेत. डिजिटल सातबाराचे बंद पडलेले सर्व्हर पुन्हा सुरु झाले असून, गेल्या दहा दिवसांत पावणेतीन लाख सात-बारा उताºयांवर डिजिटल स्वाक्षरी झाली आहे. शेतकऱ्यांना सात-बारा उतारा मिळणे सोयीचे जावे या साठी सरकारने १ मे पासून डिजिटल सातबारा उतारा देण्याची घोषणा केली होती. मात्र, जून आणि जुलै महिन्यात तांत्रिक अडचणीमुळे राज्यातील सर्व्हर ठप्प पडले होते. त्यामुळे जवळपास पावणेदोन महिने राज्यातील विविध भागातील सात-बारा उताऱ्याची कामे ठप्प पडली होती. राज्यातील औरंगाबाद, नांदेड, नंदुरबार, लातूर आणि परभणी येथील सर्व्हर १९ जुलै रोजी सुरु झाले. या जिल्ह्यात सर्वात शेवटी सर्व्हरचे काम सुरु झाले. त्यानंतर वेगाने सात-बारा उताऱ्याचे काम सुरु करण्यात आले. राज्यात १८ जुलै पर्यंत १ लाख ४१ हजार डिजिटल स्वाक्षरी असलेले सातबारा वितरीत करण्यात आले होते. त्यानंतर ३० जुलै अखेरीस ती संख्या ४ लाख १३ हजार १७२ झाली. म्हणजेच २ लाख ७२ हजार १७२ डिजिटल सातबारा उतारा त्या नंतरच्या अवघ्या दहा दिवसांतच वितरीत झाले.  सध्या राज्यातील १९ जिल्हे मुंबईतील स्टेट डाटा सेंटरशी जोडलेले असून, ८ जिल्हे बीएसएनएल क्लाऊड, ६ जिल्हे पुण्यातील एनआयसी आणि २ जिल्हे स्थानिक सर्व्हरशी जोडण्यात आले आहेत. प्रत्येक विभाग निहाय सर्व्हर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. हे काम झाल्यानंतर डिजिटल स्वाक्षरीचे काम सुरु होईल.  राज्यातील १० लाख नागरिकांनी या डिजिटल सेवेचा फायदा घेतला आहे. राज्यातील अडीच कोटी सात-बारा उतारा आॅनलाईन उपलब्ध आहे. सध्या डिजिटल स्वाक्षरी देण्याचे काम थांबविलेले आहे. आॅनलाईन सात-बारा उताऱ्याची प्रत काढून, त्यावर तलाठ्याची स्वाक्षरी घ्यावी लागत आहे. असा उतारा ग्राह्य धरण्यात येत असल्याची माहिती ई फेरफार प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी दिली. ------------------जिल्ह्यातील दीड लाख सातबारा उताऱ्यांवर डिजिटल स्वाक्षरीजिल्ह्यात १५ लाख सातबारा उतारे असून, त्यातील मावळ, मुळशी, दौंड, बारामती, इंदापूर आणि भोर तालुक्यातील दीड लाख सातबारा उताºयांवर डिजिटल स्वाक्षरी झालेले आहे. हवेली तालुक्यात सव्वा दोन लाख सातबारा उतारा आहेत. या तालुक्यातील १६० गावांपैकी १२० गावांचे काम सुरु आहे. 

टॅग्स :PuneपुणेonlineऑनलाइनFarmerशेतकरीGovernmentसरकारMaharashtraमहाराष्ट्र