शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

"राज्य सरकार लसींसाठी जागतिक निविदेची परवानगी देत नाही", हा भाजपचा खोटा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2021 13:09 IST

गणेश बीडकर यांनी मागावी पुणेकरांची माफी

ठळक मुद्देभाजपकडून कोरोनाच्या लसींचा वापर राजकारणासाठी केला जातोय हे सिद्ध

पुणे: राज्य सरकार कोरोना लसींसाठी जागतिक निविदेची परवानगी देत नाही हा राज्य सरकारवरचा आरोप सपशेल खोटा आहे, त्यामुळे आता हा आरोप करणाऱ्या भाजपच्या गणेश बीडकर यांनी पुणेकरांची माफी मागावी अशी मागणी महाविकास आघाडी, पूणेच्या वतीने करण्यात आली.

राज्य सरकारने सक्षम स्थानिक स्वराज संस्थांना अशी निविदा काढण्याला कधीचीच परवानगी दिली आहे. शुक्रवारी सकाळी ऊपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच बिडकर यांना वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी ते सांगितले, त्याचवेळी बिडकरांचे अज्ञान ऊघड होऊन भाजपाकडून कोरोनाच्या लसींचा  वापर राजकारणासाठी केला जातोय हे सिद्ध झाले अशी टीका करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप रमेश बागवे, संजय मोरे यांनी पवार यांची भेट झाल्यावर पत्रकारांशी बोलताना भाजपाला लक्ष्य केले. मोहन जोशी, शाम देशपांडे, प्रशांत बधे व अन्य पदाधिकारी यावेळी ऊपस्थित होते.

भाजपने पुणे शहरात सर्व लसीकरण केंद्र ताब्यात घेतली. तिथे स्वतःचे, पक्षाचे नाव झेंडे लावले. राज्य सरकार लशींचा पुरवठा सकाळी करते व महापौर त्याचे वाटप रात्रीच करतात, त्यांचे नगरसेवक टोकन वाटतात. त्यामुळे पहाटेपासून रांगेत थांबले त्यांची निराशा होते. या सर्व गोष्टी महापालिका आयूक्त विक्रमकुमार यांच्या निदर्शनास आणल्या, त्यांंनी दखल घेतली नाही त्यामुळे आज अजित पवार यांना सांगितल्या असे जगताप बागवे मोरे यांंनी सांगितले. त्यांनी याची दखल घेत प्रशासनाला राजकीय हस्तक्षेप होऊ देऊ नये म्हणून बजावले असल्याची माहिती जगताप यांनी दिली.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार गिरीश बापट, आमदार चंद्रकांत पाटील कोरोनासारख्या महामारीचा वापर राजकारणासाठी करून पुणेकरांच्या जीवाशी खेळत आहेत असा आरोप मोहन जोशी यांनी  केला. लस वितरणाची सर्व जबाबदारी कॉल सेंटर स्थापन करून त्यांच्याकडे द्या, टोकन पद्धत बंद करा अशी मागणी अजित पवार यांच्याकडे केली असल्याचे तिन्ही शहराध्यक्षांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याGovernmentसरकारMaharashtraमहाराष्ट्रChief Ministerमुख्यमंत्री