शेतकरी हितार्थ निर्णय घेण्यासाठी राज्य सरकार कटिबद्
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:10 IST2020-12-06T04:10:40+5:302020-12-06T04:10:40+5:30
चाकण : केंद्र सरकारने बनवलेले कृषी कायदे शेतकरी व जनविरोधी आहेत.या कायद्याच्या विरोधात सध्या दिल्लीत मोठे शेतकरी आंदोलन सुरू ...

शेतकरी हितार्थ निर्णय घेण्यासाठी राज्य सरकार कटिबद्
चाकण : केंद्र सरकारने बनवलेले कृषी कायदे शेतकरी व जनविरोधी आहेत.या कायद्याच्या विरोधात सध्या दिल्लीत मोठे शेतकरी आंदोलन सुरू आहे,त्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचे येथील शेतकऱ्यांना आवाहन करत राज्यातील
बाजार समितीबाबत व शेतकरी हितार्थ निर्णय घेण्यासाठी राज्य सरकार कटिबध्द असल्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील,आमदार संजय जगताप,गुलाब गोरे,जमीरभाई काझी,विजय डोळस,कैलास सांडभोर,सतिश राक्षे,अमोल दौंडकर,सुभाष होले,राहुल गोरे,प्रकाश वाडेकर,किरण मांजरे,अशोक बिरदवडे,प्रीतम परदेशी,चंद्रकांत गोरे,राम गोरे,आनंद गायकवाड,महेश शेवकरी,विशाल नायकवाडी,मोबिन काझी,
अमोल जाधव,दत्ता गोरे,विक्रम शिंदे उपस्थित होते. दरम्यान, पटोले यांनी उपबाजार समितीमधील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले.
नाना पटोले म्हणाले, नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका बँलेट पेपरवर झाल्याने महाविकास आघाडीस मोठे यश मिळाले आहे.यामुळे भविष्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ह्या देखील बँलेट पेपरवर घेणे आवश्यक आहे. यासाठी राज्य निवडणुक आयोगाला राज्य सरकारला विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी खेड तालुक्यातील घनकचरा व्यवस्थापन व प्रक्रिया करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी तसेच चाकण व राजगुरुनगर या नगरपरिषदेचा हद्दवाढ प्रस्ताव राज्य शासनाकडे प्रलंबित असलेबाबत तातडीने निर्णय व्हावा तसेच चाकण नगरपरिषद आपत्ती व्यवस्थापन आराखाडा,रूग्णवाहीका आणि
जिल्हा परिषद मार्फत सर्व ग्रामपंचायतींना माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत घेण्याबाबत निवेदने यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना देण्यात आली. यावर राज्य सरकारला शिफारस करण्याचे व आवश्यकता भासल्यास याबाबत मुंबईत बैठक लावण्याचे आश्वासन दिले आहे.
फोटो
०५ चाकण पटोले
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.