शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

भामा-आसखेडमधून विसर्ग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 00:47 IST

१ हजार ६५३ क्युसेक्सने पाणी सोडण्यास सुरुवात

आसखेड : भामा-आसखेड धरणातून शनिवारी (दि. २०) पाणी सोडण्याचा आदेश होता; परंतु कित्येक वर्षांपासून धरणग्रस्तांचे पुनर्वसन, तसेच काही प्रश्न रखडल्याने आधी आमचे प्रश्न सोडवा, त्यानंतरच पाणी सोडू देऊ, अशी भूमिका धरणग्रस्तांनी घेतली होती. शासनाने शुक्रवारपर्यंत निर्णय घेत प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. यानंतर ३१ तारखेपर्यंत प्रश्न सोडविले जातील, या जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर शनिवारी सकाळी १०.२० वाजता ११०० क्युसेक्सने व १२.२० वाजता १ हजार ६५३ क्युसेक्सने पोलीस बंदोबस्तात आसखेड धरणातून पाणी सोडण्यात आले, अशी माहिती शाखा अभियंता भारत बेंद्रे यांनी दिली.सध्या आसखेड धरणात १०० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी सुमारे १ हजार २९२ मिलिमीटर पाऊस पडल्यामुळे विहिरी-नाले समाधानकारक भरलेली होती. परंतु यंदा फक्त ७७५ मिलिमीटरच पाऊस झाला. त्यामुळे समोर येऊन ठेपलेल्या दुष्काळामुळे पाण्याचे नियोजन करणे हे धरण प्रशासनापुढील महत्त्वाचे आव्हान आहे. रब्बी हंगामातील पहिले आवर्तन २० आॅक्टोबरला सोडणे अपेक्षित होते. परंतु धरणग्रस्तांच्या कित्येक वर्षीच्या प्रलंबित प्रश्नामुळे त्यांनी केलेल्या विरोधामुळे ६ दिवस पाणी सोडण्यास उशीर झाला. त्यामुळे खेड, शिरूर, दौंडला वरदान ठरत असलेले भामा-आसखेडच्या पाण्याने यंदा शेतकºयांच्या पिकांना अडचणीत आणले.धरणाची पाणी साठवणक्षमता ८.१४ टीएमसी एवढी आहे. धरणात सध्या १०० टक्के पाणीसाठा आहे. पाण्याची पातळी ६७१.५० मीटर आहे. धरणात २३०.६४७ दलघमी व उपयुक्त पाणीसाठा २१७.१२५ दलघमी आहे. वेळोवेळी या धरणातून सोडण्यात येणाºया पाण्यामुळे खेड तालुक्यासह शिरूर, दौंड तालुक्यातील नदीकाठच्या गावांना आणि विविध गावच्या पाणी योजनांना होतो. त्याबरोबर नदीवरील कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे पूर्णपणे भरले जातात. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे या पाण्याचा फायदा खेडसह शिरूर व दौंड या तीन तालुक्यांना होणार आहे. त्यामुळे हे धरण तीनही तालुक्यांतील शेतकरी व नागरिकांना कायमच वरदान ठरले आहे, तर नदीकाठाजवळपासच्या गावांची तहान भागली आहे.शनिवारी सोडण्यात आलेले पाणी आलेगावपागापर्यंत पोहोचेल, अशा बेताने सोडण्यात येणार आहे. धरणग्रस्तांच्या आंदोलनामुळे लांबणीवर पडलेले आवर्तन सुमारे ३० ते ३५ पोलीस कर्मचाºयांच्या बंदोबस्तात सोडण्यात आले. सुरुवातीला ११०० क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले. जिल्हाधिकाºयांच्या आश्वासनानंतरही दक्षता म्हणून धरण प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात पाणी सोडले.यावेळी धरण प्रशासनाचे कार्यकारी अभियंता बी. के. शेटे, पोलीस निरीक्षक सुनील पवार, पं. स. सदस्य चांगदेव शिवेकर, उपविभागीय अधिकारी एस. आर. शर्मा, शाखा अभियंता भारत बेंद्रे आदींसह पोलीस यंत्रणा, ग्रामस्थ, नागरिक व धरण प्रशासनाचे कर्मचारी उपस्थित होते. परंतु जिल्हाधिकाºयांच्या सूचनेचे पालन करीत प्रकल्पग्रस्त (बाधित शेतकरी) धरणाकडे विरोध करण्यास फिरकले नाही.

टॅग्स :DamधरणWaterपाणी