शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

Pune Rain: पुण्यात पावसाची दमदार 'बॅटिंग'! शनिवारपासून जोरदार सुरु, धरणातील पाणीसाठ्यात वाढ

By श्रीकिशन काळे | Updated: July 14, 2024 12:10 IST

Pune Rain शनिवारपासून संततधार पावसामुळे पुणेकरांनी या पावसाळ्यात प्रथमच दिवसभर सरींचा आनंद घेतला

पुणे : अनेक दिवसांनंतर पावसाने शनिवार आणि रविवारी सकाळी दमदार बॅटिंग केली. दिवसभर संततधार आणि शनिवारी रात्री सुद्धा मध्यम सरी कोसळल्या असून रविवार सकाळपर्यंत पाऊस सुरु होता. कारण धरणक्षेत्रातही चांगला पाऊस झाला. या हंगामातील शनिवारचा पाऊस सर्वाधिक आणि आनंद देणारा ठरला. लोणावळ्यात तर २४१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस जिल्ह्यात सर्वत्र पडला. त्यामुळे शेतकरीराजाही खूष झाला. खडकवासला धरण प्रकल्पात १ टीएमसीने वाढ झाली आहे. (Pune Rain) 

दोन दिवसांपासून मॉन्सून सक्रिय झाला आहे. त्यामुळे राज्यासह पुणे जिल्ह्यात पावसाची हजेरी लागत आहे. शनिवारी देखील दिवसभर पावसाची हजेरी होती.  दरम्यान घाटमाथ्यावरही चांगला पाऊस होत आहे. शनिवारी (दि. १३) जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. घाटमाथ्यावर तर मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

शनिवारी सकाळपासूनच शहरात वरूणराजाने हलक्या ते मध्यम सरींची बरसात केली. तर संपूर्ण जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. संततधार पावसामुळे पुणेकरांनी या पावसाळ्यात प्रथमच दिवसभर सरींचा आनंद घेतला. संततधार असल्याने कुठेही पूर आल्याची परिस्थिती दिसून आली नाही.  गेल्या २४ तासांत आज सकाळी ८.३० पर्यंत लोणावळ्यात सर्वाधिक २४१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तसेच शिवाजीनगरला ३७ मिमी पाऊस नोंदवला गेला. 

मॉन्सूनची आस असलेला कमी दाबाचा पट्टा काहीसा दक्षिणेकडे सरकला आहे.  राजस्थानच्या श्री गंगानगरपासून हिस्सार, दिल्ली, बाराबंकी, देहरी, असनसोल ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. उत्तर गुजरात आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

तसेच महाराष्ट्रापासून उत्तर केरळ किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा कायम आहे. बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यामुळे पुढील तीन-चार दिवस पावसाचे असणार आहेत. पुढील आठवड्यात संततधार पाऊस कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

पुण्यातील २४ तासांतील पाऊस 

लोणावळा : २४१.५ मिमी लवासा : १६० मिमीमाळिण : ७७.५ मिमी एनडीए : ५६.५ मिमी पाषाण : ३८.५ मिमी शिवाजीनगर : ३७ मिमी खेड : ५३ मिमी चिंचवड : ३० मिमी बारामती : १२.८ मिमी वडगावशेरी : १९.५ मिमी दापोडी :: १९.५ मिमी हडपसर : २७.५ मिमी बालेवाडी : १७.५मिमी मगरपट्टा : १४ मिमी कोरेगाव पार्क : ०.५ मिमी 

माॅन्सून सक्रिय असल्याने चांगला पाऊस होत आहे. गेल्या आठवड्यात पावसाने ओढ दिली होती. पण आता त्याने जोर पकडला आहे. येत्या आठवड्यातही चांगल्या पावसाचा अंदाज आहे. पुण्यात दोन दिवस संततधार पडत असल्याने धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होत आहे.  -डाॅ. अनुपम कश्यपी, माजी प्रमुख, भारतीय हवामानशास्र विभाग, पुणे

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसenvironmentपर्यावरणWaterपाणीSocialसामाजिकTemperatureतापमान