शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

"नाट्यगृह सुरु करा, कलाकारांना न्याय द्या", अशा घोषणाबाजीत पुण्यात रंगकर्मींचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 15:15 IST

कोरोना महामारीमुळे गेल्या दीड वर्षांपासून विविध क्षेत्रातील रंगकर्मींचे प्रचंड हाल

ठळक मुद्देकलाकारांच्या सर्व मागण्या सरकार समोर ठेवून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

पुणे : नाट्यगृह चालू झालीच पाहिजेत, कलाकारांना न्याय मिळालाच पाहिजे, अशी घोषणाबाजी करत पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रंगकर्मींनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. यावेळी आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाही काढण्यात आला. 

कोरोना महामारीमुळे गेल्या दीड वर्षांपासून विविध क्षेत्रातील रंगकर्मींचे प्रचंड हाल झाले आहेत. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. जनसामान्यांना मनोरंजनातून निखळ आनंद देणाऱ्या या कलाकारांकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. त्यांना जागे करण्यासाठी रंगकर्मी आंदोलन महाराष्ट्र यांनी सोमवारी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. 

यावेळी कलाकारांनी गाण्यावर नृत्य करत आंदोलनाला सुरुवात केली.  कलाकारांच्या सर्व मागण्या सरकार समोर ठेवून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हे आंदोलन एकाच वेळीस झाले आहे. सिनेमा, मालिका, नाटक क्षेत्रातील कलाकारांबरोबरच तमाशा, भजन, कीर्तन, गोंधळ, पोवाडा, लावणी, लोककला सादर करणाऱ्या रंगकर्मींचाही या आंदोलनात सहभागी झाले होते. कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठीच्या मागण्या या आंदोलनातून सरकारपुढे मांडण्यात आल्या आहेत. तमाशा महामंडळ, मुक्तांगण परिवार, जादूगार संघटना, महाक्रांती चित्रपट संघटना इत्यादी संघटनांनी रंगकर्मी आंदोलनाला पाठिंबा दिला.  

आंदोलनातील त्वरित मागण्या 

- एक, दोन किंवा अतिशय कमी कलाकारांना घेऊन जे लोक कलावंत आपली कला दाखवून गुजराण करतात. त्यांना आपली कला सर्वत्र सादर करण्याची व त्यासाठी प्रवासाची परवानगी मिळावी. - चित्रीकरण, थिएटर व सांस्कृतिक कार्यक्रम त्वरित पूर्ववत सुरु करावेत. - शासनाने कलाकारांच्या मुलांना शाळेत विना फी प्रवेश द्यावा - महाराष्ट्रातील कलाकारांना रंगकर्मी रोजगार हमी योजना लागू करावी- कोरोना काळात परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत शासनाने प्रत्येक कलाकारास दरमहा ५ हजार रुपये द्यावेत - मराठी चित्रपटांना त्वरित अनुदान मिळावे   

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीMaharashtraमहाराष्ट्रartकलाcinemaसिनेमा