शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

पुणे - नाशिक रेल्वेसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करा ; विभागीय आयुक्त सौरभ राव यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 18:41 IST

गेल्या अनेक वर्षांपासून केवळ चर्चेत असलेला पुणे - नाशिक हायस्पीड रेल्वे मार्ग आता खऱ्या अर्थाने रुळावर येण्याची तयारी सुरू झाली

ठळक मुद्देपुणे जिल्ह्यात ५७५ हेक्टर जमीन संपादित करणार 

पुणे : पुणे - नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी आवश्यक असलेले भूसंपादनाचे काम निधीची वाट न पाहता त्वरीत सुरू करण्याचे आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी संबंधित उपविभागीय अधिकारी यांना दिले आहेत. यासाठी पुणे जिल्ह्यातील हवेली, खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील सुमारे ५७५ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार असल्याचे राव यांनी सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून केवळ चर्चेत असलेला पुणे - नाशिक हायस्पीड रेल्वे मार्ग आता खऱ्या अर्थाने रुळावर येण्याची तयारी सुरू झाली आहे. गेल्या पाच महिन्यांपासून संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा केवळ "कोरोना" या एकाच कामात व्यस्त आहेत. परंतु मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी सर्व प्रशासकीय यंत्रणेला आता कोरोना सोबतच प्रलंबित विकास कामांना गती देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार (दि.२५) रोजी बैठक घेण्यात आली. याबाबत राव यांनी सांगितले, पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी पुणे, नगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यातील सुमारे १४७० हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील चार तालुक्यातील हवेली, खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील ५७५ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. भूसंपादना संदर्भात रेल्वे विभागाकडून प्रस्ताव दाखल झाले आहेत. या ५७५ हेक्टर जमिनीसाठी १२०० ते १५०० कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. परंतु रेल्वेकडून अद्याप कोणताही निधी मिळालेला नाही. भूसंपादनासाठी आवश्यक असलेला निधी मिळण्यासाठी त्वरीत निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भातील प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. ---भूसंपादनासाठी चार उपविभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती  पुणे - नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनासाठी हवेली, खेड,आंबेगाव आणि जुन्नर उपविभागीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली . या अधिकाऱ्यांनी भूसंपादनासाठी आवश्यक जमिनीसाठी मोजणी करणे, सर्च रिपोर्ट तयार करण्याचे काम त्वरित सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेNashikनाशिकState Governmentराज्य सरकारSaurabh Raoसौरभ राव