शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

कात्रज ते तोरणा गड पीएमपीएमएल बससेवा सुरू करा;आमदार शंकर मांडेकर यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 17:38 IST

पीएमपीएमएल बससेवा वेल्हे या ठिकाणाहून बंद झाल्याने सध्या उपलब्ध असलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अपुरी पडत आहे.

वेल्हे : कात्रज ते तोरणा गड (वेल्हे) पीएमपीएमएल बससेवा सुरू करण्याची मागणी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक तथा अध्यक्ष यांच्याकडे भोर-मुळशी-राजगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर मांडेकर यांनी केली आहे.आमदार शंकर मांडेकर यांनी पीएमपीएमएलला एक निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, ग्रुप ग्रामपंचायत वेल्हे बु. हे तालुका मुख्यालय असून गावची लोकसंख्या ही वर्ष २०११ चे जनगणनेनुसार २४२० इतकी आहे. परंतु, परिसरातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. वेल्हे बु. हे गाव मोठ्या प्रमाणात विस्तारित आहे. या गावामधून रोज दैनंदिन कामानिमित्त, व्यवसाय, शिक्षण, आरोग्य व शेतीच्या बाजारपेठेच्या निमित्ताने पुणे शहर व पुण्याच्या इतरत्र भागांमध्ये नियमितपणे प्रवास करणाऱ्यांची फार मोठी संख्या आहे.पूर्वी पीएमपीएमएल बससेवा सुरू होती; परंतु नंतरच्या काळात सुरू असलेली पीएमपीएमएल बससेवा वेल्हे या ठिकाणाहून बंद झाल्याने सध्या उपलब्ध असलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अपुरी पडत आहे. त्याचबरोबर खंडित प्रवासामुळे मानसिक ताण-तणाव वाढत असून नागरिकांना अनेक समस्यांना तोड द्यावे लागत असल्याचे आमदार शंकर मांडेकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPublic Transportसार्वजनिक वाहतूकpassengerप्रवासीBus Driverबसचालक