शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

डिक्कीतील ऐवज चोरुन तो बनला लखपती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 21:38 IST

पार्किंग केलेल्या दुचाकीच्या डिक्कीतून रोख, मौल्यवान ऐवज चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट ४ ला यश आले आहे.

पुणे : पार्किंग केलेल्या दुचाकीच्या डिक्कीतून रोख, मौल्यवान ऐवज चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट ४ ला यश आले आहे. विशेष म्हणजे तो डिक्कीचे कुलूप न तोडता वरील प्लॉस्टीकचे शिट ताकदीने उचकटून त्यातून हात घालून हाताला लागेल ती वस्तू चोरुन नेत असे त्यांच्याकडून १२ गुन्हे उघडकीस आले असून साडेचार लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

सुभाष ऊर्फ बाबा लक्ष्मण बनपट्टे (वय ४०, रा़ वडारवाडी) असे त्याचे नाव आहे. याबाबतची माहिती सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे, पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांनी दिली़. तीन आठवड्यापूर्वी नाना पेठेतील इमारतीच्या पार्किंगमधून दुचाकीची डिक्की उचकटून पैसे चोरीला गेले होते़ त्या ठिकाणच्या सीसीटीव्हीमध्ये आरोपी कैद झाला होता. गुन्हे शाखेच्या युनिट ४ चे कर्मचारी रमेश चौधर, निलेश शिवतरे यांना सराईत गुन्हेगार बनपट्टे याने ही चोरी केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वडारवाडी भागात पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले. त्याच्याकडे तपास करता त्याने यापूर्वी बरेच गुन्हे केल्याचे व त्यातून जामीनावर सुटल्यानंतर पुणे शहरात अनेक ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून १२ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. त्याच्याकडून लॅपटॉपसह ४ लाख २७ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, सहायक निरीक्षक अश्विनी जगताप, उपनिरीक्षक विजय झंझाड, कर्मचारी शंकर संपते,  रमेश साबळे, गणेश साळुंके, अतुल मेंगे, शितल शिंदे, सचिन ढवळे, रमेश चौधर आदिंनी ही कामगिरी केली़. 

ऐवज चोरीला गेला आहे, अशांनी पोलिसांशी संपर्क साधावाबनपट्टे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीचे १० गुन्हे दाखल आहेत. तो २०१५ मध्ये कारागृहातून बाहेर आला आहे. तेव्हापासून तो चोऱ्या करत आहे. त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. ज्यांचे दुचाकीचे डिक्कीची चावी न लावताऐवज चोरीला गेला आहे, अशांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी केले आहे. चोऱ्यातून तो करत होता बचतबनपट्टे याचे दोन विवाह झाले असले तरी दोन्ही पत्नी त्याच्याजवळ रहात नाही़त. तो केवळ मोपेड त्यातही काही ठराविक दुचाकींचे डिक्कीतून वस्तू चोरत असे. चोरलेल्या पैशांतून काही पैसे तो खाण्यापिण्यासाठी खर्च करीत असत. काही पैसे तो व्याजाने देत असत. त्याला इतर कोणतेही व्यसन नसल्याने उरलेल्या पैशांची तो बचत करीत असे. त्याची दोन बँकांमध्ये खाती असून त्यातील एका खात्यातील ४ लाख रुपये पोलिसांनी हस्तगत केले आहेत.

टॅग्स :theftचोरीPoliceपोलिसPuneपुणे