हाॅस्पिटलच्या लिफ्टमध्ये अडकले कर्मचारी ; 3 तास सुरु हाेता सुटकेचा थरार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 02:28 PM2019-12-31T14:28:02+5:302019-12-31T14:29:58+5:30

हडपसर येथील एनॅक्स हाॅस्पिटलच्या लिफ्टमध्ये 13 महिला कर्मचारी अडकल्या हाेत्या. त्यांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरुप सुटका केली.

Staff stranded in a hospital elevator ; incident in hadapsar | हाॅस्पिटलच्या लिफ्टमध्ये अडकले कर्मचारी ; 3 तास सुरु हाेता सुटकेचा थरार

हाॅस्पिटलच्या लिफ्टमध्ये अडकले कर्मचारी ; 3 तास सुरु हाेता सुटकेचा थरार

googlenewsNext

पुणे : पुण्यातील हडपसर भागातील एनॅक्स हाॅस्पिटलच्या लिफ्टमध्ये 13 महिला कर्मचारी अडकल्याची घटना आज सकाळी 6.30 च्या सुमारास घडली. तब्बल तीन तासांच्या प्रयत्नानंतर 13 ही महिलांना सुखरुप बाहेर काढण्यामध्ये अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. 

हडपसर येथील एनॅक्स हाॅस्टिपटलची लिफ्ट सकाळी 6.30 सुमारास अडकली. या लिफ्टमध्ये 13 महिला कर्मचारी हाेत्या. वस्तूतः 8 लाेकांची क्षमता असणाऱ्या लिफ्टमध्ये 13 कर्मचारी असल्याने ओवर लाेड हाेऊन लिफ्ट पहिल्या व दुसऱ्या मजल्याच्या दरम्यान बंद पडली. त्यानंतर हाॅस्पिटलकडून लिफ्ट बसविणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. परंतु त्यांच्याकडून लिफ्टमधील नागरिकांना सुरक्षित बाहेर काढता न आल्याने साडेनऊच्या सुमारास अग्निशमन दलाला याबाबतची माहिती देण्यात आली. काही वेळातच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. लिफ्टमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्यांना धीर देत त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले. रस्सीच्या सहाय्याने तसेच लिफ्ट कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने आतील सर्व महिलांंना 20 ते 25 मिनिटात सुखरुप बाहेर काढण्यात आले. 

दरम्यान लिफ्टमध्ये अडकलेल्या महिलांच्या सुरक्षेसाठी लिफ्टचा दाेर कापून लिफ्ट खाली घेऊन त्यांना लवकरात लवकर बाहेर काढण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाच्या जवानानांकडून सुरु हाेते. यावेळी लिफ्ट बसविलेल्या कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांमध्ये बाचावाची झाली. कंपनीकडून बाऊंसर सुद्धा पाचारण करण्यात आले हाेते. अग्निशमन दलाच्या जवानांना फाेटाे काढण्यास देखील मज्जाव करण्यात आला. अखेर जवानांच्याच सहाय्याने अवघ्या 20 मिनिटांमध्ये महिलांना बाहेर काढण्यात आले. 

या रेस्क्यु ऑपरेशनमध्ये अग्निशमन दलाचे काेंढवा खुर्दचे स्टेशन प्रमुख शिवाजी चव्हाण, जवान अनिल गायकवाड, शुभाष खाडे, सागर दळवी, निलेश वानखेडे, देवदूत चे जवान हर्षद येवले, शिंदे यांनी सहभाग घेतला. 

Web Title: Staff stranded in a hospital elevator ; incident in hadapsar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.