शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
5
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
6
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
7
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
8
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
9
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
10
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
11
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
12
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
13
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
14
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
15
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
16
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
17
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
18
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
19
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
20
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?

एसटीच्या नॉन एसी स्लीपर बस लवकरच धावणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 9:11 PM

सर्वसामान्यांना परवडण्याच्या दृष्टीने एसटीने आणखी एक पाऊल पुढे टाकत विना वातानुकूलीत स्लिपर (नॉन एसी स्लिपर) बसेस महामंडळाच्या ताफ्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

ठळक मुद्देएसटी प्रशासन : नियमातून एसटीला सुट दिल्याने लवकरच आरामदायी बसरात्रीच्या वेळी प्रवास करण्यास एसटीच्या गाड्यांना प्राधान्य

पुणे : विना वातानुकूलित स्लिपर (नॉन एसी स्लिपर) बसेसची नोंदणी आणि वाहतुकीच्या नियमातून राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (एसटी) राज्य सरकारने सूट दिली आहे. त्यामुळे लवकरच एसटीच्या विना वातानुकूलीत स्लिपर (नॉन एसी स्लिपर) बस रस्त्यावर धावताना दिसतील, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली. राज्यात विना वातानुकूलित स्लिपर बसेसच्या नोंदणीला संमती नाही. एसटी महामंडळाच्या बाबतीत ही अट शिथिल करण्यात आली आहे. महामंडळातर्फे लांब पल्ल्याच्या गाड्या मोठ्या प्रमाणात चालविल्या जातात. रात्रीच्या वेळी प्रवास करण्यास एसटीच्या गाड्यांना प्राधान्य दिले जाते. लांबच्या प्रवासासाठी प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी एसटीमध्ये स्लिपर कोच गाड्या आणण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार काही वातानुकूलित स्लिपर (एसी स्लिपर) बसेस महामंडळाच्या ताफ्यात दाखलही झाल्या आहेत. मात्र, सर्वसामान्यांना परवडण्याच्या दृष्टीने एसटीने आणखी एक पाऊल पुढे टाकत विना वातानुकूलीत स्लिपर (नॉन एसी स्लिपर) बसेस महामंडळाच्या ताफ्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. महामंडळाने या प्रस्तावास आधीच मान्यता दिली आहे. राज्यात अशा गाड्यांना नोंदणी मिळत नसल्याने तांत्रिक अडचण होती. पण प्रवाशांची गरज लक्षात घेऊन परिवहन विभागाने १३ एप्रिल २०१६ रोजी दिलेल्या पत्रानुसार राज्य सरकारने एसटी महामंडळास नियमातून सवलत दिली. आता विना वातानुकूलित स्लिपर बसेसची बांधणीही महामंडळाने सुरु केली आहे. त्यामुळे एसटीच्या ताफ्यात लवकरच या बस दाखल होतील, असे एसटी प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.