एसटी महाराष्ट्राची ओळख, तिचं खासगीकरण नाहीच! अनिल परब यांची स्पष्टोक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 05:45 PM2021-06-18T17:45:23+5:302021-06-18T17:49:53+5:30

एसटी महामंडळाला कोरोनाच्या महामारीत आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे एसटीचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत...

ST Maharashtra's identity, not its privatization! Anil Parab's statement | एसटी महाराष्ट्राची ओळख, तिचं खासगीकरण नाहीच! अनिल परब यांची स्पष्टोक्ती

एसटी महाराष्ट्राची ओळख, तिचं खासगीकरण नाहीच! अनिल परब यांची स्पष्टोक्ती

Next

पिंपरी : एसटी ही महाराष्ट्राची ओळख आहे. त्यामुळे कोणी काहीही बोलले तरी एसटीचे खासगीकरण होणार नाही. एसटीच्या कोणत्याही कर्मचाऱ्याचा पगार थकणार नाही. या अडचणीतून बाहेर येण्यासाठी शासनाने एसटीला ६०० कोटींचा निधी दिला आहे. त्यामुळे वेतनासारख्या अत्यावश्यक गोष्टीना आता अडचण येणार नाही, अशी माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष व परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. 

परब म्हणाले, एसटी महामंडळाला कोरोनाच्या महामारीत आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे एसटीचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. खर्च कमी करून उत्पन्न वाढविणे, उत्पन्नाचे स्रोत वाढविणे, मार्गांचे सुसूत्रीकरण करणे, काही गाड्यांच्या फेऱ्यांचे एकत्रीकरण करणे, अशा उपाययोजना केल्या जात आहेत, एसटीचे खासगीकरण करण्यात येणार नाही.

दापोडी येथील एसटीच्या कार्यशाळेला भेट दिल्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी भोसरी येथील सेन्ट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च अँड ट्रान्सपोर्ट (सीआयआरटी ) येथे भेट दिली. त्यावेळी बोलत होते. या ठिकाणी परब यांनी एसटीच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेत एसटीच्या उत्पन्न वाढीसंदर्भातील विविध पर्यायावर चर्चा केली. 
............
अनिल परब म्हणाले, कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांत एसटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही काळ तर एसटीचे उत्पन्न एकदम शून्यावर आले होते. अजूनही एसटीची सेवा पूर्णपणे चालू होण्यासाठी दोन ते तीन महिने लागू शकतात. या काळात एसटीचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी प्रयत्न सुरु आहे. एसटीचा खर्च कमी करून उत्पन्न वाढ कशी करता येईल, याकडे लक्ष दिले जात आहे. 
एसटीचा खर्च कमी करण्यासाठी एसटीच्या मार्गांचे सुसूत्रीकरण करण्यात येणार आहे.''
............

Web Title: ST Maharashtra's identity, not its privatization! Anil Parab's statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app