क्यूआर काेडमुळे सुट्या पैशांच्या वादातून सुटली एसटी, ऑनलाइन पेमेंट करून काढता येणार तिकीट
By अजित घस्ते | Updated: December 11, 2023 19:28 IST2023-12-11T19:28:05+5:302023-12-11T19:28:44+5:30
आता पीएमपीबरोबर एसटी महामंडळानेही ऑनलाइन तिकिटाची सुुविधा सुरू केल्याने सूट वादातून एसटी सुटली आहे. त्याच धर्तीवर एसटीने तिकिटासाठीही ऑनलाइन पेमेंट देण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे....

क्यूआर काेडमुळे सुट्या पैशांच्या वादातून सुटली एसटी, ऑनलाइन पेमेंट करून काढता येणार तिकीट
पुणे : आता प्रत्येकाकडे एटीएम कार्ड व मोबाइल ॲप आहेत. त्यातून अनेक जण ऑनलाइन पेमेंट करीत असतात. प्रत्येक जण आता डिजिटल पेमेंट करण्यावर भर देत आहे. त्यामुळे खिशात पैसे ठेवत नाही. त्यामुळे पैशांच्या अनेक समस्यांना एसटीतील वाहकांना प्रवाशांच्या समस्यांना तोंड द्यावे लागत होते. यातून अनेक वेळा वाद झाल्याच्या घटना पाहायला मिळत होत्या. त्यामुळे आता पीएमपीबरोबर एसटी महामंडळानेही ऑनलाइन तिकिटाची सुुविधा सुरू केल्याने सूट वादातून एसटी सुटली आहे. त्याच धर्तीवर एसटीने तिकिटासाठीही ऑनलाइन पेमेंट देण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून डिजिटल मशीनची सुविधा सुरू केली आहे. पुणे विभागातील १४ आगारांत ही सुविधा सुरू झाली आहे. त्यामुळे प्रवासी आणि वाहकांमध्ये सुट्या पैशांसाठी होणारी कटकट मिटली आहे.
कार्ड स्वॅप करा अन् काढा तिकीट
सर्वत्रच डिजिटलची सोय झाल्याने प्रवासी घाईगडबडीने एसटी गाडीत बसतात; पण पैसे नसल्याने अनेक वेळा वादही झालेले आहेत. त्याच धर्तीवर एसटीच्या तिकिटासाठीही ऑनलाइन पेमेंट देण्याची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे.
पैसे सांभाळण्याची जोखीम झाली कमी...
पुणे विभागातील सर्व १४ आगारांतील सर्व वाहकांकडे ऑनलाइन सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची कामेही हलकी होणार आहेत, तसेच वाहकांना पैसे सांभाळण्याची जोखीमही कमी होणार आहे.
शिवाजीनगर-वाकडेवाडी येथून मराठवाडा-विदर्भात ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. त्यामुळे येथून ऑनलाइन पेमेंट सुविधा सुरू झाल्याने रोजचे 18 ते 20 हजार ऑनलाइन पेमेंट जमा होत आहे. यामुळे प्रवाशांना ऑनलाइन डिजिटलचा फायदा होत आहे.
- ज्ञानेश्वर रणवरे शिवाजीनगर आगार प्रमुख