शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पुणे - नाशिक महामार्गावर एसटी चालकाला मारहाण; तर महिला कंडक्टरला नेले फरफटत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2021 13:23 IST

खेड तालुक्यात पुणे - नाशिक महामार्गावर तुकाईभांबुरवाडी येथे ही घटना घडली

ठळक मुद्देरस्त्यावर कारमध्येच उभी करून एसटीची समोरील काच फोडली.

राजगुरुनगर: मला साईट का दिली नाही म्हणून एसटी चालकाला मारहाण करून महिला कंडक्टरला कारच्या बोनटवर १०० फुटापर्यत फरफटत नेले. ही घटना खेड तालुक्यात पुणे -नाशिक महामार्गावर तुकाईभांबुरवाडी येथे घडली आहे. याबाबत कार वरील अज्ञात चालकाविरोधात खेड पोलिस ठाण्यात एसटी बस चालक सदु किसन भालेराव (वय. ४३ धंदा.नोकरी रा.खेड) या चालकाने एसटी चालकाने फिर्याद दिली

राजगुरुनगर आगाराची एस बस तुकाईभांबुरवाडी दरम्यान पुणे -नाशिक महामार्गावरून मंचर दिशेला जात होती. दरम्यान एसटी बसला मागून ओव्हर टेक करणाऱ्या कारने एसटी बसला आडवी उभी केली. कारमधून लाकडी काठी काढून एसटीची समोरील काच फोडली. चालक बाजूचा दरवाजा उघडून चालकाला मारहाण केली. त्यावेळी एसटी बस वरील कंडक्टर सारिका चिंचपुरे यांनी त्या कार चालकास ‘‘ तुम्ही असे करू नका आम्ही आॅन डयुटी आहेत. असे म्हणाले असता कार चालकाने ‘‘ मला साईड का दिली नाही, मला एक मर्डर करण्याचा आधिकार आहे. मी तुमच्या दोघाकडे बघून घेतो मी कोण आहे हे तुम्हाला दाखवितो ’’ असे म्हणून निघून जाऊ लागला. दरम्यान कंडक्टर चिंचपुरे यांनी आमचे आधिकारी येईपर्यंत कार चालकास थांबण्याची विनंती केली.

परंतु तो न थांबता निघून जाऊ लागला. म्हणून वाहक चिंचपुरे यांनी कारचा समोरील एक वायपर धरल्यावर त्याने कार थांबवली नाही. चिंचपुरे यांना जवळपास शंभर फुटापर्यंत परफटत नेले तेव्हा रस्त्याने जाणारे दुस-या गाडी वरील लोक हे मोठयाने ओरडल्याने त्याने कार थांबवली. वाहक चिंचपुरे हया खाली उतरल्यानंतर तो तिथुन पुढे मंचर बाजुकडे निघून गेला. अज्ञात चालका विरूध्द सरकारी कामात अडथळा निर्माण करून मारहाण शिविगाळ,दमदाटी करून एस.टि बसची काच फोडली. याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फरारी कार चालकाचा तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक वर्षा राणी घाटे करित आहे.

टॅग्स :PuneपुणेNashikनाशिकPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटक