शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

राज्यातील 'बळीराजा'च्या मदतीला 'लालपरी'ची धाव; ४४ हजार रोपांची शेताच्या बांधावर 'डिलीव्हरी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 17:49 IST

एसटी महामंडळाच्या पुढाकारामुळे कोरोना लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांना मोठी मदत झाली आहे.

ठळक मुद्दे बारामतीमध्ये राज्यातील पहिला प्रयोग ठरला यशस्वी खासगीच्या तुलनेने एसटीचा खर्च कमी असुन शेतकऱ्यांची होत आहे बचत

बारामती:  राज्यात उद्योजकांपाठोपाठ बळीराजाच्या मदतीला 'लालपरी' धावणार आहे. बारामतीमध्ये राज्यातील पहिला प्रयोग यशस्वी ठरला आहे. या प्रयोगाअंतर्गत येथील कृषि विज्ञान केंद्रातुन  ४४ हजार ऊस रोपांची शेताच्या बांधावर 'डिलीव्हरी' करण्यात आली आहे.एसटी महामंडळाच्या पुढाकारामुळे कोरोना लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांना मोठी मदत झाली आहे. सुरक्षित वाहतुकीबरोबरच शेतकऱ्यांच्या खर्चात मोठी बचत झाल्याने हा प्रयोग फायद्याचा ठरत आहे.

बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कमधुुन कोरोना लॉकडाऊनच्या काळात कपडे वाहतुक करण्यात आली.तसेच, उद्योगांना देखील वाहतुकीसाठी चांगली मदत झाली.परप्रांतीयांना त्यांच्या मायभुमीमध्ये पोहचविण्यासाठी देखील लाल परी धावली. आता बळीराजाच्या मदतीसाठी लाल परी धावत आहे.कोरोनामुळे अनेक ठिकाणी खासगी वाहतुक बंद आहे.परिणामी शेतीच्या कामावर परिणाम झाला आहे. एसटीमधुन शेतीच्या बांधावर रोपे मिळत असल्याने शेतकऱ्यांची खोळंबलेली कामे मार्गी लागण्यास मोठी मदत झाली आहे.

बारामती येथील अ‍ॅग्रीकल्वरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलीत कृषि विज्ञान केंद्र आणि बारामती आगार यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम सुरु आहे.याबाबत कृषि विज्ञान केंद्राचे फार्म मॅनेजर महेश जाधव यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले, कोरोनामुळे काही ठिकाणी वाहतुकीला अडचण होत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर रोपे मिळावी,या उद्देशाने एसटी बसमधुन वाहतुक सुरु आहे. आतापर्यंत ४४ हजार रोपांचा भीमाशंकर कारखाना,जुन्नर परिसरात पुरवठा करण्यात आला आहे.यामध्ये एसटीला १ लाखासाठी केवळ २५० रुपये अधिभार दिल्यानंतर नुकसान झाल्यास एसटीच्या वतीने भरपाई देण्याची सोय आहे.राज्यात कोणत्याही ठिकाणी पोहच सुविधादेण्यात येत आहे. खासगीच्या तुलनेने एसटीचा खर्च कमी असुन शेतकऱ्यांची बचत होत आहे.

अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी सांगितले,कोरोना लॉकडाऊन काळात या सेवेचा शेतकºयांना फायदा होईल.शेतकऱ्यांनी याचा अवश्य फायदा घ्यावा,असे आवाहन चेअरमन पवार यांनी केले.—————————————

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसState Governmentराज्य सरकार