SSC Result 2025 ( Marathi News ): महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. या वर्षीही राज्यात मुलींनीच बाजी मारली आहे. निकालात कोकण पुन्हा 'नंबर वन' आहे. दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे.
आज मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केला. या वर्षी दहावीचा राज्याचा निकाल ९४.१० टक्के एवढा लागला आहे. तर कोकण विभागाने पहिला नंबर घेतला असून कोकण विभागाचा ९९.८२ टक्के एवढा निकाल लागला आहे.
विभागनिहाय निकालाची टक्केवारी
कोकण : ९९.८२ टक्केमुंबई : ९५.८४ टक्केपुणे : ९४.८१ टक्के नागपूर : ९०.७८ टक्के छत्रपती संभाजीनगर : ९२.८२ टक्केकोल्हापूर : ९६.७८ टक्के अमरावती : ९२.९५ टक्केनाशिक : ९३.०४ टक्केलातूर : ९२.७७ टक्के
ऑनलाईन निकाल येथे पाहता येणार
https://results.digilocker.gov.in
https://sscresult.mahahsscboard.in
http://sscresult.mkcl.org
https://results.targetpublications.org