शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पुणे विद्यापीठातील क्रीडा संकुलाला ऑलम्पिक विजेते 'खाशाबा जाधव' यांचं नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2021 19:01 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठात आवारातील तब्बल २७ एकर जागेत सर्व प्रकारचे इनडोअर व आऊट डोअर खेळ खेळण्याची सुविधा निर्माण केली आहे

ठळक मुद्देविद्यापीठाने या क्रीडा संकुलासाठी सुमारे ५० कोटी रुपये खर्च

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उभारण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा संकुलाला देशाला स्वातंत्र मिळाल्यानंतर ऑलम्पिकमध्ये पहिलं  पदक मिळवणारे पैलवान खाशाबा जाधव यांचं नाव देण्याचा निर्णय बुधवारी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. दिवाळीनंतर विद्यापीठाच्या कीडा संकुलाचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे.

महाविद्यालयीत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे आणि विविध आंतरराष्ट्रीय स्थरावर घेतल्या जाणा-या क्रीडा प्रकारांचा सराव करता यावा,या उद्देशाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठात आवारातील तब्बल २७ एकर जागेत सर्व प्रकारचे इनडोअर व आऊट डोअर खेळ खेळण्याची सुविधा निर्माण केली आहे. बालेवाडी येथील क्रीडा संकुलानंतर विद्यापीठातील क्रीडा संकुल हे सर्वात मोठे कीडा संकुल असणार आहे. त्यात रनिंग ट्रॅक ,अ‍ॅथलॅटिक, टेनिस, खो-खो, कबड्डी, शुटिंग रेंज, बॅडमिंटन आदी सुमारे १०० खेळांचे प्रशिक्षण घेता येणार आहे.

विद्यापीठाने या क्रीडा संकुलासाठी सुमारे ५० कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यातील काही रक्कम विद्यापीठ अनुदान आयोगाकडून प्राप्त झाली असून काही राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाकडून (रुसा) मिळाली आहे. उर्वरित रक्कम विद्यापीठाने स्वत: खर्च केली आहे. क्रीडा संकुलाच्या आवारात सुमारे २  हजार क्षमतेचे प्रशस्त सभागृह उभारण्यात आले आहे. सुमारे पाच ते सहा वर्षापासून सुरू असलेल्या या क्रीडा संकुलाचे काम अंतिम टक्क्यात आहे. हॉकी व जलतरण तलावाचे काम पुढील एक ते दिड महिन्यात पूर्ण होणार आहे. त्यानंतर क्रीडा संकुलाचे उद्घाटन केले जाणार आहे.

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे यांनी बुधवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीय क्रीडा संकुलाला खाशाबा जाधव यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मांडला. त्यास व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.व्ही.बी.गायकवाड यांनी अनुमोदन दिले.

राजेश पांडे म्हणाले, विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या क्रीडा संकुलाचा निश्चितच फायदा होईल. क्रीडा संकुल आंतरराष्ट्रीय दर्जाचे असल्यामुळे खेळाडूंना आॅलंपिकसह इतर क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी सराव करणे सोपे जाईल. विद्यापीठाचे माजी विद्यार्थी खाशाबा जाधव यांचे नाव क्रीडा संकुलाला दिल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल.

टॅग्स :PuneपुणेPune universityपुणे विद्यापीठOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021Educationशिक्षणTeacherशिक्षक