हिंदुस्थान में 'चमचों' की भी कमी पड गयी क्या..? नितीन गडकरी 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 04:23 PM2019-11-15T16:23:04+5:302019-11-15T16:53:46+5:30

चीनमधून उदबत्तीपासून प्लास्टिकचे चमचे देखील आपल्या देशात आयात केले जाते..

Spoon has also been lacking in Hindustan? Nitin Gadkari | हिंदुस्थान में 'चमचों' की भी कमी पड गयी क्या..? नितीन गडकरी 

हिंदुस्थान में 'चमचों' की भी कमी पड गयी क्या..? नितीन गडकरी 

Next
ठळक मुद्देमराठा चेंबर ऑफ़ कॉमर्सच्या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुण्यात रोजगारनिर्मिती आणि निर्यात वाढवण्यासाठी उद्योग जगताने प्रयत्न करावेत

पुणे :  देशातील उद्योग व्यवसायाशी निगडित बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या बैठकीला योगायोगाने मी देखील उपस्थित होतो. त्या दरम्यान भारतीय बाजारपेठेत चिनी वस्तूंचा बोलबाला होता. उदबत्तीपासून ते चमच्यापर्यँत असं सारं काही चीनमधून आयात केले जात असल्याची माहिती मला मिळाली. त्याचा संदर्भ घेऊन मी   सेक्रेटरीला म्हणालो , अपने हिंदुस्थान में ' चमचों ' की भी कमी पड गयी क्या? हा विनोदी प्रसंग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितल्यावर सभागृहात एकच हशा पिकला. 
     पुण्यात मराठा चेंबर ऑफ़ कॉमर्सच्या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आले होते. त्यावेळी ते बोलत होते. गडकरी म्हणाले की, आपल्या देशात उद्योग व्यवसाय वाढीसाठी अनेक उपक्रम हाती घेण्यात आहे. त्या दृष्टीने रोजगारनिर्मिती आणि निर्यात वाढवण्यासाठी उद्योग जगताने प्रयत्न करावेत, सरकार त्यांच्या पाठिशी आहे. तसेच कृषी मालवाहतूक रेल्वेने वाढली पाहिजे, जेणेकरून वाहतूक खर्च कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर आता बांबू पासून तेल मिळत असल्याने बांबू शेतीला चालना देण्यात येणार आहे. 
   येत्या साडेतीन वर्षांत दिल्ली मुंबई महामार्गाचे काम पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर 13 ते 14 तासामध्ये अंतर पार करता येणार आहे. त्याचबरोबर देशात अशा स्वरुपाचे आणखी तीन हायवे बनवले जात असून

देशात 22 ग्रीन हायवेंचं काम प्रगतीपथावर 
   देशातील अनेक राज्यामध्ये शहरांचे प्रमाण वाढत आहे. त्या सर्व शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली जात आहे. मात्र त्याच दरम्यान पुणे आणि मुंबई सारख्या शहरात उद्योग आणि व्यवसायांचे मोठ्या प्रमाणावर केंद्रीकरण झाले आहे. यामुळे खूप मोठी समस्या झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर अशा शहराच्या बाहेर देखील उद्योग व्यवसाय जाण्याची गरज असून त्यासाठी विकेंद्रीकरण करण्याची आवश्यकता असल्याचेही गडकरींनी सांगितले. 

Web Title: Spoon has also been lacking in Hindustan? Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.