न्हावरे : शिरूर-चौफुला राष्ट्रीय महामार्गावरील नागरगाव हद्दीत नलगे वस्ती (ता. शिरूर) येथे शनिवारी (दि. १४) मध्यरात्री भरधाव ट्रकने समोरासमोर कारला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. हे सर्व निमोणे गावातील असल्याने निमोणे गावावर शोककळा पसरली आहे.या अपघातात पवन राजहंस काळे (वय ३४) आणि त्यांची चिमुकली मुलगी आराध्या काळे (९, दोघे रा. निमोणे), तसेच मेहुणे बाळासाहेब प्रकाश नागवडे (३८, सध्या रा. बाबूराव नगर, शिरूर; मूळ रा. गुनवडी, जि. अहिल्यानगर) यांचा मृत्यू झाला. वंदना पवन काळे (३०) या गंभीर जखमी असून, त्यांना तातडीने पुणे येथे हलविण्यात आले आहे. निमोणे येथील पवन काळे हे पत्नी, मुलगी आणि मेहुण्यासह कोल्हापूर येथे शिक्षणासाठी असलेल्या मुलाला भेटून परत येत होते. नागरगाव हद्दीतील नलगे वस्ती येथे रात्री १२:४५ वाजण्याच्या सुमारास शिरूरकडून येणाऱ्या ट्रक (एमएच ०९ ईएम २४६४) ने त्यांच्या मोटार (एमएच १२ एसक्यू ५४४१) ला समोरासमोर जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की कारचा पुढील भागाचा चकनाचूर झाला. अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत गाडीत अडकलेल्यांना बाहेर काढले. जखमींना प्रथम चौफुला खाजगी रुग्णालयात, तर नंतर न्हावरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी तिघांना तपासून मृत घोषित केले, तर गंभीर जखमी वंदना काळे यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले आहे. या प्रकरणी ट्रकचालक धनराज काशिनाथ भिसे (रा. भिसे वाघुली, जि. लातूर) याच्याविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नकाते करत आहेत.
Web Summary : A tragic accident on the Shirur-Choufula highway claimed three lives from one family after a truck collided head-on with their car. One woman is critically injured. The deceased include a father, daughter, and uncle. The truck driver has been arrested.
Web Summary : शिरूर-चौफुला राजमार्ग पर एक दुखद दुर्घटना में एक ट्रक ने एक कार को टक्कर मार दी, जिससे एक ही परिवार के तीन लोगों की मौत हो गई। एक महिला गंभीर रूप से घायल है। मृतकों में एक पिता, पुत्री और मामा शामिल हैं। ट्रक चालक को गिरफ्तार कर लिया गया है।