शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
2
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
3
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
4
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
5
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
6
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
7
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
8
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
9
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
10
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
11
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
12
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
13
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
14
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
15
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
16
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
17
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
18
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
19
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
20
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंबाचा भार पेलत बारावीत नेत्रदीपक यश

By admin | Updated: June 6, 2015 22:13 IST

घरची परिस्थिती बेताची, घरी आठ माणसांचे कुटुंब, वडिलांचा तुटपुंजा पगार, यामुळे कमी वयातच घराचा भार खांद्यावर आला.

सासवड : घरची परिस्थिती बेताची, घरी आठ माणसांचे कुटुंब, वडिलांचा तुटपुंजा पगार, यामुळे कमी वयातच घराचा भार खांद्यावर आला. मात्र, न डगमगता विविध पक्ष्यांचे आवाज काढण्याच्या कौशल्यामुळे हा भार त्यांनी पेलला. या सोबतच शिक्षणाची गोडी कायम ठेवत आयुष्यात मोठे व्हायचे या उद्देशाने चिकाटीने अभ्यास करत दिवे येथील सुमेध वाघमारेने आपल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत बारावीत ७० टक्के गुण मिळवून नेत्रदीपक यश मिळवले आहे. त्याच्या या कामगिरीचे संपूर्ण तालुक्यातून कौतुक होत आहे. सुमेधचे मूळ गाव कलगाव (ता. जि. हिंगोली) त्याच्या घरात त्याच्यासह ६ भाऊ, आई-वडील असे आठ माणसांचे कुटुंब. थोरल्या ३ भावांची लग्न झाल्याने ते लगेच स्वतंत्र राहू लागले. या भागात दुष्काळ कायमचाच असल्याने शेतीपासून उत्पन्न कोणतेही नाही. अशा परिस्थितीत सांगली येथे एका शेतकऱ्याकडे गुरे राखण्याचे काम करत असतानाच १०वी पर्यंत शिक्षण घेतले. शेळ्या, मेंढ्या, जनावरे राखत असताना त्यांना बोलाविण्यासाठी त्यांना शिळ घालणे, तसेच विविध आवाज काढावे लागत होते. परंतु त्यालाही माहित नव्हते, की ही कला त्याच्या उत्पन्नाचे साधन होईल. आणि तसेच झाले. विविध आवाज काढत असताना ती त्याची कला होऊन बसली आणि त्यानंतर विविध पक्षी आणि प्राणी यांचे तो सहज आवाज हुबेहूब काढू लागला. सुमेध तसेच त्यांच्या छोट्या भावाला उच्च शिक्षणाकरीता त्यांचा मोठ्या भावाने त्यांना दिवे येथील पुरंदर महाविद्यालयात प्रवेश दिला. या ठिकाणी सुमेधने व्यावसायिक शिक्षण घेतले. अभ्यासाबरोबरच त्याने विविध प्राण्यांचे आवाज काढण्याची कला जोपासली. या कलेचा व्यावसायिक वापर करत त्याने उत्पन्नाचे साधन बनवले. यातून मिळालेल्या पैशातून त्यांने शिक्षण घेण्यास सुरुवात केली. सुमेधला विद्यालयाचे प्राध्यापक आणि त्याचे वर्गशिक्षक केशव काकडे यांनी मार्गदर्शन केले. दिवे येथील एका हॉटेलात आलेल्या ग्राहकांचे विविध आवाज काढून मनोरंजन करण्याचे काम त्याला मिळाले. यातुन सुमेधला चांगले उत्पन्न मिळू लागले. या भरवशावर त्याने त्याच्या लहान भावाच्या १०वी चा खर्च पूर्ण केला. स्वत: चांगला अभ्यास करत त्याने बारावीत ७० टक्के गुण मिळवून प्रथम श्रेणीत पास झाला.