शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संकटात जीवाची बाजी लावत कर्तव्य बजावणाऱ्या 'खाकी वर्दी'ला मराठी कलाकार मंडळींचा 'हटके' सलाम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 15:25 IST

आम्ही कलाकार मंडळीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र तुमचं हे योगदान कदापि विसरणार नाही...!

पुणे : कोरोना संकट चोहोबाजूनी आक्रमण करत असतानाच स्वतःचा जीव धोक्यात घालून सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्य श्रेष्ठ मानत अनेक 'कोरोना वॉरियर्स' काम करत आहे. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे. याच भावनेतून सिनेमा व नाट्य क्षेत्रातील काही कलाकार मंडळींनी पुण्यात पोलिसांचा सन्मान केला. यावेळी त्यांनी नागरिकांना या कोरोना वॉरियर्सला सहकार्य करण्याचे आवाहन देखील केले. 

पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील वडगाव पुल येथे मराठी कलाकारांनी एकत्र येत पोलिसांना गुलाबपुष्प आणि सुरक्षा कीट प्रदान करत त्यांचं कौतुक केले. तसेच रस्त्यावर ये-जा करणाऱ्या नागरिकांची देखील फलकाद्वारे कोरोनाबाबत जनजागृती देखील केली. या उपक्रमांत यावेळी ज्येष्ठ अभिनेते व निवेदक राहुल सोलापूरकर, अभिनेते आनंद इंगळे, अभिनेत्री अक्षदा देवधर, मृण्मयी देशपांडे, संस्कृती बालगुडे अभिनेता अमेय वाघ, स्वप्निल वाघ यांसह विविध कलाकार सहभागी  झाले होते. 

कोरोना काळात महाराष्ट्राचं संपूर्ण पोलीस दल रस्त्यावर उतरून कोरोनाला हरविण्यासाठी जीवाची पर्वा न करता कर्तव्ये बजावत आहे. त्यांच्याप्रती असलेला आदर व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचं मनोबल वाढविण्यासाठी ही मराठी कलाकार मंडळी बुधवारी (दि.२८) रस्त्यावर उतरले होते. यावेळी त्यांनी पोलिसांचा सन्मान करत त्यांना सहकार्य करा अशी हात जोडून विनवणी देखील केली.

अभिनेत्री अक्षया देवधर म्हणाली, कोरोना काळात स्वतःसह कुटुंबाची देखील पर्वा न करता पोलीस दल काम करत आहे.त्यामुळे त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे याच भावनेतून आम्ही हा प्रयत्न केला आहे. परंतु, या परिस्थितीत विनाकारण घराबाहेर पडू नका.आणि जर घराबाहेर पडणाऱ्यांना पोलिसांनी काही प्रश्न विचारले तर त्यांना सहकार्य करा. ते आपल्या काळजीसाठीच कर्तव्य बजावत आहे.

अभिनेता अमेय वाघ म्हणाला, आमच्या आधीच्या पिढीतील माणसांनी वेगवेगळ्या प्रकारची संकटे पाहिली होती. मात्र, कोरोना हे आमच्या पिढीने आत्तापर्यंत पाहिलेलं सर्वात मोठं संकट आहे. पण या संकटात देखील राज्याचं संपूर्ण पोलीस दल ज्या हिरीरीने सर्वच पातळ्यांवर अहोरात्र लढा देत आहे ही बाब नक्कीच कौतुकास्पद आहे. आज आम्ही फक्त कलाकारांचे प्रतिनिधी म्हणून नाही तर महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या वतीने पोलिसांविषयी आदर व्यक्त करण्याकरिता  एकत्र जमलो आहोत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याAmey Waghअमेय वाघSanskruti Balgudeसंस्कृती बालगुडेMrunmayee Deshpandeमृण्मयी देशपांडेcinemaसिनेमा