शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्तांची घरे लुटणाऱ्यांवर राहणार विशेष लक्ष : चंद्रकांत पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 11:29 IST

सांगली आणि कोल्हापूर येथे लाखो नागरिकांना पुराचा फटका बसला आहे.

ठळक मुद्देविशेथ पोलीस तपास पथक नेमण्याची सूचना

पुणे : पुरामुळे घरदार सोडून नातेवाईक अथवा सरकारी शिबिरांच्या आश्रयाला गेलेल्या नागरिकांच्या घराची चोरट्यांकडून लुट सुरु आहे. अशा घरफोड्या रोखण्यासाठी विशेष पोलीस पथक नेमण्यात येणार आहे. त्या मार्फत अशा कारवायांना आळा घालण्याची सूचना पोलिसांना केली असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी दिली.जिल्हा वार्षिक नियोजन योजनांचा आढावा महसूलमंत्री पाटील यांनी घेतला. यानंतर त्यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. कोल्हापूर व सांगली जिल्ह्याला पुराचा मोठा फटका बसला आहे. हजारो कुटुंबाना घर सोडून सुरक्षित ठिकाणांचा आसरा घ्यावा लागला. चोरट्यांनी ही संधी साधून पूरग्रस्तांच्या घरे लुटण्यास सुरुवात केली आहे. या विषयी बोलताना पाटील म्हणाले, घरफोड्या करणाºया चोरट्यांच्या कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पोलीस पथक नेमण्याची सूचना देण्यात आली आहे. अनेक व्यक्ती पूरग्रस्तांना परस्पर मदत साहित्य पोचवत आहेत. काही ठिकाणी ग्रामस्थ आम्हाला मदत हवी म्हणून, ट्रक खाली करुन घेत आहेत. नागरिकांनी देखील प्रशासनाशी समन्वय साधून मदत पाठवावी.राज्यातील ४ लाख ५३ हजार नागरिकांना पुरस्थितीतून सुरक्षित बाहेर काढले आहे. तसेच राज्यात पाचशेपेक्षा अधिक निवारा केंद्र उभारण्यात आली आहेत. या केंद्रात ३ लाखापेक्षा जास्त लोक राहत आहेत. कोल्हापूरमध्ये २ कोटी रूपयांची मदत देण्यात आली आहे. पुराचा फटका बसलेल्या गावांचे पुनर्वसन सहा ते आठ महिने चालणार आहे. तर, ६ हजार ८०० कोटी रुपयांमध्ये शेती नव्याने उभी करावी लागणार आहे. प्रत्येक आठवड्याला होणाºया मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचा आढावा घेतला जाणार असल्याचे पाटील म्हणाले.  कोल्हापूर आणि सांगली येथील पूरग्रस्त गावे दत्तक घेण्यासाठी अनेक संस्था आणि व्यक्ती पुढे येत आहेत. पंढरपूर देवस्थान ५ गावे आणि नाना पाटेकर यांची नाम संस्था २ गावे दत्तक घेणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले. ----सांगली आणि कोल्हापूर येथे लाखो नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. या भागातील पूरग्रस्तांना मंगळवारपासून आर्थिक मदत केली जात आहे. प्रत्येक व्यक्तीचे पुनर्वसन केले जाईल. वेळप्रसंगी सरकार कर्ज देखील काढेल. तसेच, पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्ज माफीसाठी देखील प्रयत्न सुरु आहेत.- चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री

टॅग्स :PuneपुणेfloodपूरRainपाऊसtheftचोरी